scorecardresearch

Video: शौचालयात धुतल्या जात आहेत ‘शिवभोजन’ केंद्रातील जेवणाच्या थाळ्या; समोर आला किळसवाणा प्रकार

विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे.

shivbhojan thali
या धक्कादायक व्हिडीओमुळे खळबळ उडालीय

गरजू व्यक्तींना माफक दरांमध्ये चांगलं भोजन मिळावं या हेतूने सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीसंदर्भात एक धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यामध्ये समोर आला आहे. कमी किंमतीत सर्वांना जेवण उपलब्ध व्हावे या हेतुने सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन थाळीच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित करणारा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील एका शिवभोजन थाळी केंद्रावरील अस्वच्छता आणि व्यवस्थापनामधील त्रुटी समोर आल्या आहेत. महागाव तालुक्यामधील त्रिमुर्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून नवीन बस स्टॅण्डसमोर लाचवण्यात येणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्रावरील भांडी शौचालयामध्ये धुतली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिली जाते ती जेवण झाल्यानंतर शौचालयातील पाण्याने धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेचे असल्याची माहिती समोर आली आहे. अशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडवली जात आहे. आता या शिवभोजन थाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला असून हा किळसवाणा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दरम्यान आता या संदर्भात अन्न व प्रशासन विभाग काय कारवाई करतं हे येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईल. मात्र हा व्हिडीओ समोर आल्याने या मोहिमेसंदर्भात शंका उपस्थित केली जाऊ लागलीय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivbhojan thali in yawatmal viral video of unhygienic condition scsg

ताज्या बातम्या