“साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो…” ; असं म्हणत उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये टिचकी वाजवून शिवेंद्रराजेंनी साधला निशाणा!

माझा त्यांच्याशी काही वाद नाही, असं देखील बोलून दाखवलं आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात डीसीसी बँक आणि पालिकेवरून वातावर तापताना दिसत आहे.आज खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत, त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं आहे. यावर बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले की, त्या संस्थेच्या निवडणुकीला येऊन त्यांनी बोलावे. ही संस्था चांगली चालली आहे आणि चालवली आहे.

तर, खासदार उदयनराजेंना पॅनलमध्ये घेणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे यांना विचारले असता ते म्हणाले.. मी पॅनलमध्ये आहे की नाही हे मलाच माहीत नाही, पॅनलचा निर्णय शरद पवार, अजित पवार घेतील त्यांना त्यांनी बोलावं असे सांगितले. तसेच, आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता, तो मीच सुरू केला आहे असे स्टेटमेंटही आता येऊ शकतं, असं म्हणत उदयनराजेंच्या स्टाईलमध्ये टिचकी वाजवत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी निशाणा साधला. तसेच, माझा त्यांच्याशी काहीही वाद नाही असंही यावेळी बोलून दाखवलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivendra raje bhosale aimed at udayan raje msr

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या