वाई : इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे निश्चित होते, आज मात्र महायुती सरकारने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्रकारांशी साताऱ्यात बोलत होते. आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. मी पहिल्यापासून सांगत होतो, हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा मला विश्वास होता.

हेही वाचा – ‘सगेसोयरे शब्दामुळे आरक्षणाचा गुंता वाढणार’, कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले, जोपर्यंत…

या लढ्याच्या यशाबद्दल मी जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य माणसांची ताकत दाखवून दिली आणि मराठा समाजानेही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताकद दिली. या लढ्यातून सर्वसामान्य माणसाची ताकद दिसून आली, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे खरोखरच ज्यांना या आरक्षणाची गरज आहे त्यांना या आरक्षणाचा नक्की लाभ होईल, असेही शिवेद्रसिंहराजे यांनी सांगितले.

या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होत. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात ते टिकलं नाही. मात्र, या आधीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. मात्र आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तो न्याय मिळवून दिला आहे.

हेही वाचा – जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये म्हणून दिलेले आश्वासन ही सरकारची चुकीची खेळी, ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया

यावेळी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेतात राबण्यात कोणता कमीपणा. शेतात राबून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देऊन दाखवलं आता संजय राऊतांनी मुखमंत्र्यांचे अभिनंदन करावे, असा टोलाही लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivendra singh raje bhosale said that the government has given justice to the maratha community by giving reservation ssb
First published on: 27-01-2024 at 15:57 IST