scorecardresearch

“राज्यपाल बदलाचा निर्णय माझ्यामुळे झाला असे होत नाही”; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

शिवेंद्रसिंहराजें म्हणाले, ज्यांने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत श्रेय घ्यायचे असे होत नाही,

“राज्यपाल बदलाचा निर्णय माझ्यामुळे झाला असे होत नाही”; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला
शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

राज्यपाल बदलाचा निर्णय माझ्यामुळे झाला असे होत नाही असे म्हणत उदयनराजे भोसले यांना शिवेंद्रसिंहराजेंनी श्रेय न घेण्याचा सल्ला दिला आहे. राज्यपाल बदलण्यासाठी प्रक्रिया असते. साधा शिपाई बदलायचा म्हटलं तर एका दिवसात होत नाही. हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजे ज्यावेळी दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले, त्यावेळी त्यांचेही हेच वक्तव्य होते. त्यांनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यानंतर यश आले, असे म्हणता येत नाही. ज्यांने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत श्रेय घ्यायचे असे होत नाही, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजेंनी यांनी खासदार उदयनराजेंची फिरकी घेतली.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या नव्या ट्वीटमुळे खळबळ, महेश आहेरांचा फोटो शेअर करत म्हणाले, “…तर धक्कादायक माहिती समोर येईल”

शिवजयंती महोत्सवाची माहिती देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी खासदार उदयनराजेंसह त्यांच्या सातारा विकास आघाडीवर जोरदार टीका केली. राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी मागेच सांगितले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य वेळी भूमिका घेतील. सगळया महाराष्ट्रातील जनतेच्या भावना जाणणारा हा नेता आहे.

हेही वाचा- “अमित शहा यांच्या मेळाव्याने कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा विजयी संकल्पाची नांदी होणार”; मकरंद देशपांडे यांचे मत

राज्यपाल बदलण्यासाठी प्रक्रिया असते. शिपाई बदलायचा म्हटलं तर एका दिवसात होत नाही. हा तर राज्यपालांचा विषय होता. उदयनराजे दिल्लीत मोदींना भेटले त्यावेळी त्यांचेच वक्तव्य होते. त्यांनी लढा केला तर लढाई आज आणि दोन महिन्यानंतर यश आले. ज्यांने त्याने उठायचे आणि माझ्यामुळे झाले म्हणत क्रेडीट घ्यायचे, अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंची फिरकी घेतली.

हेही वाचा- आव्हाडांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “कुणी सुपारी…”

सातारा शहरातील पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, हा विषय तात्काळ सोडवला जाईल. राज्य शासनाकडून या कामासाठी ११ कोटी उपलब्ध आहेत. त्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने बनवला आहे. येथे दीपमाळ केली जाणार होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकला जाईल. ते बदलण्याची सूचना केली आहे. योग्य ते बदल करून हे काम मार्गी लावले जाईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 23:04 IST