अलिबाग – रायगड किल्ल्यावर ढोल ताश्याचा गजर, मंत्रोच्चार आणि शंखानाद यांच्या गजरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावली. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्यावतीने सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा हल्लाबोल केला. राज्यसभेच्या जागेवरून बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केलाय.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “आपला सन्मान राखला जाईल तिथेच थांबायचे वाकायचे नाही, ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली आहे. त्यांनी अनेक तह केले, पण तह करताना स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांना सत्ता नको होती. स्वराज्य पाहीजे होते. हे स्वराज्य पुन्हा उभे करायचे आहे.”

Statue, Shivaji Maharaj, Assam,
आसाममध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, चीनच्या सीमेवर २१ पॅरा स्पेशल फोर्समध्ये अनावरण, साताऱ्यातील सुपुत्राचा पुढाकार
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
Udayanraje Delhi
शहांनी बडदास्त ठेवलेले उदयनराजे आता भेटीसाठीही तरसले!
Shahu Maharaj, PM Modi
समाज, राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने सगळे पक्ष पंतप्रधान मोदींचा विरोधात – शाहू महाराज

“राज्यसभेच्या जागेवरून बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न”

“आदिलशाह आणि मुघलांनी शिवाजी महाराजांची घौडदौड थांबविण्यासाठी शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांवर दबाव टाकला जात होता. काळ बदलला असला, तरी आजही सत्तेसाठी तशीच दबंगगिरी सुरु आहे. राज्यसभेच्या जागेवरून सत्तेसाठी बापलेकात भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असा गंभीर आरोप संभाजीराजेंनी केला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून किल्ल्यावर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिरकाई देवीच्या पूजनाने या सोहळ्याला प्रारंभ झाला. जगदीश्‍वर पूजन करण्यात आले. सोमवारी (६ जून) सकाळी ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पंचामृत, सप्तगंगा स्नान अभिषेकानंतर महाराजांच्या मुर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. शिवआरतीचे पठण करण्यात आले.

सुवर्णमुद्रांचा अभिषेकही करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या पालखीची शाही मिरवणूक काढण्यात आली. या चैतन्यमय वातावरणात राज्यभरातून हजारो शिवभक्त गडावर दाखल झाले होते. शंखनाद आणि तुतारीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. पालखी सोहळ्यानंतर झालेल्या महाप्रसादाने सोहळ्याचा समारोप झाला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी शिवप्रतिमेचा अभिषेक केला. या निमित्याने छत्रपती संभाजी महाराजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके देखील यावेळी सादर करण्यात आली. तलवार, दांडपट्टे चालवून महाराजांना मानवंदना देण्यात आली. ढोलताशा गजरही करण्यात आला. शिवाजी महाराजांचा महिमा सांगणारे पोवाडे यावेळी शाहीरांनी सादर केले. वारकरी संप्रदायही पहिल्यांदाच या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी झाला. मावळ प्रांतातून १०० वारकरी टाळमृदूंग घेऊन गडावर दाखल झाले होते.

हेही वाचा : राज्य सरकारचा मोठा निर्णय! संपूर्ण राज्यात ६ जून ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार

दोन वर्ष करोनाच्या महामारीमुळे गडावर मोठ्या प्रमाणात या सोहळ्याचे आयोजन होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवभक्तांनी गर्दी होईल अशी अपेक्षा प्रशासनाला होती. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. गडावर गर्दी होऊ नयेत यासाठी वाहतूक नियमन करण्यात आले होते. अन्नछत्र सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. गडाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात ठेण्यात आला होता.