शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर आता या प्रकरणाला नवीन वळण मिळताना दिसत आहे. ३ ऑगस्टला विनायक मेटेंच्या कारचा बीड ते पुणे प्रवासादरम्यान दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खळबळजनक दावा अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याने केला आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी या कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कार्यकर्त्याचा दावा काय आहे ?

शिवसंग्रामचे कार्यकर्ते अण्णासाहेब वायकर यांनी विनायक मेटेंच्या गाडीचा जवळपास दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग झाल्याचा दावा केला आहे. ३ ऑगस्ट रोजी विनायक मेटे त्यांच्या एका कार्यकर्त्यासमवेत पुण्याच्या दिशेने येत असताना हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्थानिक पत्रकाराशी संवाद साधतानाची त्यांची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
Case against Congress workers for burning effigy of Prime Minister
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?

“३ तारखेलाही दोन गाड्या विनायक मेटेंच्या गाडीचा पाठलाग करत होत्या”, कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं!

“३ ऑगस्ट रोजी पुण्याजवळ दोन गाड्यांनी मेटेंच्या गाडीचा दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यात एक अर्टिगा कार होती आणि दुसरी आयशर होती. मी विनायक मेटेंना म्हणालो की थांबून बघू. पण ते म्हणाले जाऊ दे, प्यायलेले आहेत. आम्ही बैठकीसाठी बीडहून येत होतो. आमच्या गाडीच्या पुढे आयशर होती. मागून एक अर्टिगा कार कट मारत होती. त्यात तीन-चार लोक बसले होते. विनायक मेटेंची गाडी समाधान वाघमोडे चालवत होता. तीन ऑगस्टला पुण्याच्या अलिकडे शिक्रापूरजवळ हा प्रकार घडला”, अशी माहिती अण्णासाहेब वायकर यांनी दिली.

ज्योती मेटे यांनी उपस्थित केली शंका –

विनायक मेटे यांच्या अपघातासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मीदेखील नुकतीच ती ऑडिओ क्लिप ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझंदेखील बोलणं झालं आहे. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे”.

पाहा व्हिडीओ –

Photo : अपघातानंतर विनायक मेटेंना एक तास मदत पोहोचलीच नाही? सहकाऱ्याचा दावा, सांगितला घटनाक्रम!

“३ ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचंदेखील अण्णासाहेब यांनी सांगितलं आहे. गाडीचा अपघात व्हावा अशा पद्धतीने ओव्हरटेक केलं जात होतं असं त्यांनी सांगितलं. या अपघातामधील आणि त्या गाडीचा काही संबंध आहे का याचा तपास झाला पाहिजे. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.

नेमकं झालं काय?

मराठा आरक्षणासाठी १४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.