लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजपा युतीनेही कोल्हापुरात सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासहित संजय राऊत, आदेश बांदेकर अशी काही महत्त्वाची नावे आहेत. शिवसेनेने 22 मार्च रोजी उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली होती.
शिवसेनेची स्टार प्रचारकांची यादी –
1) उद्धव ठाकरे
2) आदित्य ठाकरे<br />3) सुभाष देसाई
4) दिवाकर रावते
5) रामदास कदम
6) संजय राऊत
7) अनंत गीते
8) आनंदराव अडसूळ
9) चंद्रकांत खैरे
10) एकनाथ शिंदे
11) आदेश बांदेकर
12) गुलाबराव पाटील
13) विजय शिवतारे
14) सुर्यकांत महाडीक
15) विनोद घोसाळकर
16) नीलम गो-हे
17) लक्ष्मण वडले
18) नितीन बानगुडे पाटील
19) वरुण सरदेसाई
20) राहुल लोंढे
भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे. फक्त युतीच नाही तर लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातील समनव्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत.
लोकसभा मतदारसंघ – सिंधुदूर्ग, रायगड, मावळ (रायगमधील तीन विधानसभा)
शिवसेना – सुभाष देसाई
भाजपा – रवींद्र चव्हाण
लोकसभा मतदारसंघ – कल्याण, ठाणे, पालघर भिवंडी
शिवसेना- एकनाथ शिंदे
भाजपा – रवींद्र चव्हाण
लोकसभा मतदारसंघ – पुणे, बारामती, शिरुर, सोलापूर, माढा, मावळ (रायगडमधील तीन विधानसभा वगळून)
शिवसेना – नीलम गोऱ्हे
भाजपा – गिरीश बापट
लोकसभा मतदारसंघ – सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले
शिवसेना – नितीन बानगुडे पाटील
भाजपा- चंद्रकांत पाटील
लोकसभा मतदारसंघ – नाशिक, दिंडोरी, रावेर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी
शिवसेना – दादा भुसे
भाजपा – गिरीश महाजन
लोकसभा मतदारसंघ – हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव
शिवसेना – अर्जून खोतकर
भाजपा – पंकजा मुंडे
लोकसभा मतदारसंघ – बुलढाणा, अकोला, वाशीम-यवतमाळ, वर्धी, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर, रामटेक
शिवसेना – डॉ दीपक सावंत
भाजपा – चंद्रशेखर बावनकुळे
