Cyclone Nisarga: रायगडसाठी उद्धव ठाकरेंकडून १०० कोटींची मदत जाहीर

उद्धव ठाकरेंनी केली रायगडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. वादळाचा फटका बसलेल्या इतर राज्यांचीही आपण काळजी घेणार असून लवकरच मदत जाहीर करु असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे रायगडमधील नुकसानाची पाहणी कऱण्यासाठी पोहोचले आहेत. पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंनी यावेळी पॅकेज हा शब्द वापरणं टाळलं.

उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना सांगितलं की, “आपण पॅकेज जाहीर करणार नसून तातडीनं रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारकडून १०० कोटी देत आहोत. एक अंदाज घ्यावा लागेल. उगाच वारेमाप घोषणा करण्यात अर्थ नाही. ताबडतोब जे काही करता येईल त्याला सुरुवात केली आहे. नुकसानीकडे पाहत असताना पंचनामे कऱण्यास सुरुवात केली आहे. पंचनामे पूर्ण होण्यास आठ ते दहा दिवस लागतील. त्यानंतर अंतिम मदत जाहीर करु,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, केंद्राकडे मदत मागण्यासंबंधी विचारलं असता उद्धव ठाकरेंनी नुकसान झाल्यानंतर लगेच मागावं असं होऊ नये. आपण व्यवस्थित आढावा घेऊन मदत मागू असं सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदतीचं आश्वासन दिलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

आणखी वाचा- शिवरायांच्या रायगडाला वादळ पचवणं काही नवीन नाही – उद्धव ठाकरे

“आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशीच रायगडमद्ये यावं लागलं. निसर्गाचं रौद्ररुप आपण पाहिलं पण रायगडने ते अनुभवलं. ती दृष्य अत्यंत भीतीदायक होती. रायगडमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आलो आहे. जीवितहानी होऊ न देणं प्रशासनाचं काम असतं. पण सहा जण मृत्यूमुखी पडले हे दुर्दैव आहे. पैसे देता येतात पण घरातली गेलेली व्यक्ती परत येत नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“रायगड आणि वादळ हे काही नवीन नाही. शिवरायांच्या रायगडला वादळ पचवणं काही नवीन नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “पण हे वादळ बऱ्याच वर्षांनी आलं. ताकदीने रायगडावर धडकलं. वादळाचा धोका टळला असला तरी करोनाचं संकट कायम आहे. घरं उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांची राज्य सरकार सोय करणार असून लवकरात लवकर स्वच्छता करणं गरजेचं असल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shivsena cm uddhav thackeray announce 100 crore for for raigad nisarga cyclone sgy

ताज्या बातम्या