scorecardresearch

Premium

Datta Dalvi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक झालेले दत्ता दळवी आहेत कोण?

मी बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे अशी ओळख दत्ता दळवींनी काही वेळापूर्वीही करुन दिली.

Know About Datta Dalvi
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवी दिल्याने दत्ता दळवी यांना तुरुंगात जावं लागलं आहे. (फोटो सौजन्य-ग्राफिक्स टीम, लोकसत्ता, ऑनलाईन)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं मुंबईच्या माजी महापौरांना चांगलंच भोवलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) माजी महापौर, दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दत्ता दळवींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तेव्हा, दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देताना दत्ता दळवी म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय. मी केलेल्या वक्तव्याबद्दल वावगं वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलं आहे. आनंद दिघे यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द वापरला, तोच मी बोललो आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने चर्चेत आलेले दत्ता दळवी कोण आहेत आपण जाणून घेऊ.

MP Shrikant Shinde
खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात, “पूर्वी मुख्यमंत्र्यांचे ‘दूर’दर्शन, आता मात्र…”
Devendra Fadnavis first reaction on Abhishek ghosalkar firing
“गाडीखाली एखाद्या श्वानाचा मृत्यू झाला तर…”, राजीनाम्याच्या मागणीवर देवेंद्र फडणवीसांचे विधान
Hemant Dabhekar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची ‘वर्षा’वर भेट घेणारा हेमंत दाभेकर कोण?
What Uddhav Thackeray Said?
“देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’च्या घोषणा देत होते तेव्हा टरबूज होते, आता पार…”, उद्धव ठाकरेंचा टोला

कोण आहेत दत्ता दळवी?

जसं दत्ता दळवी यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं तसं ते बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. दत्ता दळवींनी आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली होती. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच ते चर्चेत आले. बाळासाहेब ठाकरेंचा विश्वास त्यांनी संपादन केला. शिवसेनेच्या विभागा क्रमांक सातच्या विभागप्रमुखाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसंच २००५ आणि २००७ या कालावधीत दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणूनही काम केलं. या काळात त्यांची कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईत दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अनेक कडवट शिवसैनिक तयार केले. त्यामध्ये दत्ता दळवी यांचे नाव पहिल्या यादीत येतं. भांडुपमध्ये रविवारी शिवसेनेचा ठाकरे गटाच्या कोकण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात माजी महापौर आणि उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर भाषणात शिवीगाळ केली. त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत त्यांना अटक केली आहे. त्यानंतर दत्ता दळवी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

२०१८ मध्ये दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंविरोधात दंड थोपटले. तसंच शिवसेनेवरही दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उद्धव ठाकरेंसह राहणंच पसंत केलं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवी दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

दत्ता दळवी यांचं नाव एप्रिल २०२२ मध्येही चर्चेत आलं होतं. त्यावेळी मालवण तालुक्यातील एका गावात अनधिकृतपणे बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. या झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी दळवी यांच्यासह १२ जणांवर गुन्हा देखील दाखल केला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena datta dalvi police arrested former mayor of uddhav thackeray for abusing word about cm eknath shinde who is datta dalvi scj

First published on: 29-11-2023 at 18:48 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×