भाजपा नेते किरीट सोमय्यांवरील हल्ल्याचं शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे तिथे मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली गेली असती असं विधान केलं आहे. रायगड प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपाली सय्यद यांनी राणा दांपत्यावरही निशाणा साधला. राजद्रोहाच्या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालय दंड लावून सोडणार असेल तर शिवसैनिकांनी फेकलेल्या चपलांचा हिशेबसुद्धा बंटी बबलीकडून घ्यावा असं यावेळी त्यांनी म्हटलं.

“हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. जो नडला त्याला फोडला ही त्यांची शिकवण आहे. त्या ठिकाणी मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली गेली असती,” असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
jewellery police pune
पुणे : रिक्षा प्रवासी महिलेचे सात तोळ्यांचे दागिने गहाळ; पाेलिसांच्या प्रयत्नांमुळे दागिन्यांचा शोध

दीपाली सय्यद पुढे म्हणाल्या की, “राणा दांपत्य मोदींची माकडं आहेत. अचानाक येतात आणि बोलतात. त्यांचं वक्तव्यं चुकीचं होतं. मातोश्रीत घुसून पठण करणार असं वक्तव्य करणं चुकीचं होतं. तुम्हाला करण्यासाठी मनाई नव्हती. तुम्ही प्रेमाने आला असतात…मंदिरं आहे तिथे केलं असतं पण तुम्हाला मातोश्रीमध्ये घुसूनच करायचं होतं का? हे काहीतरी विचित्र सुरु असल्याचं दिसत आहे”.

“राष्ट्रपती राजवट लावा किंवा आमचा मुख्यमंत्री बसवा तरच या गोष्टी थांबणार असं काही सुरु आहे,” अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली. “राणा दांपत्याच्या पोटात दुखू लागलं आहे. अरे बाबांनो, न्यायालयीन कोठडी आहे. फाईव्ह स्टार हॉटेल नाही,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

“मशिदीवरील भोंग्यांबाबत न्यायालयीन आदेशाचे पालन होणार. आपल्या घरचे कायदे चालणार नाहीत,” असं दीपाली सय्यद यांनी यावेळी म्हटलं. “किरीट सोमय्या जरा काही झालं की दिल्ली, मोदी यामध्ये गुरफटलेले आहेत, यांना लोकशाही माहितच नाही का?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.