नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही. यापूर्वी दोघांनी एकमेकांची लायकी काढली होती. मात्र, निलेश राणे यांनी ट्वीट करत पुन्हा केसकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या वादावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केसरकरांना खोचक टोला लगावला आहे. दोघांच्या वादावरून युतीमध्ये नेमकं काय चाललयं हे समजेल, असे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले सचिन अहिर?

कालचं आदित्य ठाकरे यांनी केसरकरांबाबत काय बोलायचं ते बोललेत. अनेकवेळा काही लोकांनी कुठं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं याला काही मर्यादा असतात. आदित्य ठाकरे यांनी काल योग्य शब्दात सांगितलं आहे. एकंदरीत यांच्यातील विसंगती हळू हळू सुरू झाली आहे. त्यामुळे दोघांच्या वादावरून युतीमध्ये नेमकं काय चाललयं हे समजेल, असे ते म्हणाले.

नेमकं काय आहे प्रकरण?

भाजपाच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घेतली होती. मात्र, त्यानंतर मी राणेंसोबत काम करण्यात तयार आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर निलेश राणे यांनी ट्वीट करत केसकरांना खोचक टोला लगावत. ‘१ तारखेपासून आमच्याकडे ड्रायवरची जागी रिकामी आहे. अर्ज करु शकता’, अस ट्वीट केले होते.