मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला असा वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं आज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कलाकार म्हणून अभिनेते रमेश देव यांचा जीवनप्रवास चाहत्यांसाठी एक मोलाची आठवण ठरला असताना त्यांचा अल्प काळाचा राजकीय प्रवास देखील त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात कायमचा राहणार आहे.

रमेश देव यांच्या निधनाने कलानगरीला धक्का बसला आहे. रमेश देव यांनी कोल्हापूरला आपली कर्मभूमी मानले होते. रमेश देव यांचे वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते. त्यांची जडणघडण कोल्हापुरात झाली. येथील भक्ती सेवा विद्यापीठ त्यांचे शिक्षण झाले. मित्रांसमवेत एकदा जयप्रभा स्टुडिओमध्ये फेरफटका मारण्यासाठी देव गेले होते. त्यांना पाहून भालजी पेंढारकर यांनी त्यांना ‘येरे माझ्या मागल्या’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. तेव्हापासून त्यांचा चित्रपट प्रवास सुरू झाला.

women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
kalyan lok sabha seat, dr Shrikant Shinde, criticise uddhav thackeray, criticise vaishali darekar, lok sabha 2024, mimicry artist, uddhav thackeray mimicry artist, uddhav thackeray shivsena, eknath shinde shivsena, kalyan dombivali news, election 2024,
बॉस नकलाकार असला की कार्यकर्तेही नकलाकारच असतात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वैशाली दरेकर यांच्यावर टीका
Kailash Gahlot ED custody
अरविंद केजरीवालांनंतर आता आपच्या आणखी एका मंत्र्याच्या मागे ईडीचा ससेमिरा; कोण आहेत कैलाश गेहलोत?

अभिनेता ते नेता

रमेश देव यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. १९९६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवताना त्यांनी दोन लाखाहून अधिक मते घेतली होती. तेव्हा त्यांचा मुक्काम न्यू शाहूपुरी येथील मेरा हॉटेल (आताचे मराठा) येथे होता. त्यांच्या प्रचारासाठी पत्नी सीमा, मुलगा अजिंक्य हेही सहभागी झाले होते.

Video : …जेव्हा रमेश देव यांनी ९०व्या वर्षी धरला होता ‘सूर तेच छेडिता’ गाण्यावर ठेका, व्हिडीओ व्हायरल!

..आणि रमेश देव वरातीमध्ये नाचले!

प्रचार काळातील एक आठवण सांगताना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, निम्मा जिल्हा प्रचारासाठी फिरायचा होता. वेळेत प्रचाराच्या ठिकाणी पोहोचता यावे यासाठी प्रथमच रथ बनवलेला होता. एकदा राजारामपुरी भागातून जात असताना तिथे लग्नाची वरात जात होती. ते पाहून रमेश देव रथातून उतरले. त्यांनी वरातीत सहभागी होऊन नृत्य केले. वऱ्हाडी मंडळींशी गप्पा मारल्या आणि मग पुढे प्रचारासाठी प्रस्थान केले”.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यातूनच त्यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनाप्रमुखांचा जवळचा सहकारी गमावल्याचे दुःख शिवसैनिकांना होत आहे”, अशा शब्दांत संजय पवार यांनी रमेश देव याना श्रद्धांजली वाहिली.