मुंबईतील शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी ( ११ नोव्हेंबर ) रात्री ‘बाळासाहेबांच्या शिवसेने’त ( एकनाथ शिंदे गट ) प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मात्र, त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्धार केला आहे. या सगळ्या घडामोडींवर अमोल कीर्तिकर यांनी भाष्य केलं आहे.

“वडिलांनी शिंदे गटात जाण्याच्या घेतलेला निर्णय त्यांचं वैयक्तिक मत आहे. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असून, माझा निर्णय वडिलांना सांगितलं आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर कायम राहणार आहे. मात्र, वडिलांपासून विभक्त होणार नाही,” असे अमोल कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

manoj jarange patil, mahayuti, mahavikas agahdi, lok sabha election 2024, maratah reservation
महायुती, आघाडी दोन्ही आपल्यासाठी सारखेच : जरांगे पाटील
Prithviraj Chavan, narendra modi,
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अपयशाचा अंदाज आल्याने मोदींची जीभ घसरतेय – पृथ्वीराज चव्हाण
dharashiv, vanchit,
धाराशिव : वंचितचे कुकर, एमआयएमचा पतंग आणि बीएसपीचा हत्ती, कोणाला होणार लाभ, कोणाची गुल होणार बत्ती?
Prithviraj Chavan, pm modi,
“..तर देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकांची ठरली असती”; पृथ्वीराज चव्हाणांचे पंतप्रधानांवर टीकास्र

हेही वाचा : “त्यांच्या…”, विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी लढणारी स्त्री”

गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेत आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला आहे. अमोल कीर्तिकर म्हणाले, “माझ्या जन्माच्या आधीपासून त्यांची राजकीय कारकिर्द सुरु आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. राजकारणातील वादविवाद घरापर्यंत येऊ नये, असं माझं मत आहे. वडिलांच्या निर्णयाशी असहमत असल्याने आदित्य ठाकरेंबरोबर आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी काम करेन,” असेही अमोल कीर्तिकर यांनी सांगितलं. ते टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.