शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्री जाहीर केले आहेत. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आता भुमरे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत खैरे हे औरंगाबाद शहराचे भकास पालकमंत्री होते. मी मात्र शहराचा विकास करणार, असा हल्लोबोल भुमरे यांनी केला होता.

संदीपान भुमरे यांनी केलेल्या टीकेला आता चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “पालकमंत्री होतो, तेव्हा जिल्ह्यात विकासाची कामे केली. भुमरे यांच्या घरापासून गेलेला राष्ट्रीय महामार्ग माझ्या पाठपुराव्यामुळे झाला, हे विसरु नका. उगच मी २० वर्ष निवडून आलो नाही आहे.”

हेही वाचा – संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“हे गद्दार पालकमंत्री झाले तरी त्यांना कोण विचारणार नाही. अधिकारी खूप हुशार असतात, तुमचं ते ऐकनार नाहीत. तुम्हाला कुत्रही विचारणार नाही. खेड्यातून आलेल्या माणसाला काय समजतं. २० वर्षे खासदार होतो, लल्लू-पंजू आहे का?, पाच वर्षे पालकमंत्री होतो, तेव्हा भूमरेंना समजून घेतलं,” असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग लष्कराच्या नजरकैदेत? चीनमध्ये नेमकं काय घडतयं, जाणून घ्या…

“पालकमंत्री झाला आहात, किती दिवस राहाल हे माहिती नाही. मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून शहर व जिल्ह्याच्या विकासाची कामे करा. माझ्यावर टीका करण्याआधी मला लोकांनी चारवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते, याची आठवण ठेवा,” असेही चंद्रकांत खैरे म्हणाले. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.