शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून भाजपा आणि शिंदे सरकावर टीकेचे ‘बाण’ सोडले होते. यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘तुला पुरुन उरेन,’ असा एकेरी उल्लेख करत राणेंनी ठाकरेंना इशारा दिला आहे. यावरून आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंचा समाचार घेतला आहे.

“नारायण राणे केंद्रीय मंत्री असून, ते पातळी सोडतात त्यांच्यावर आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलू नये. ही त्यांची लायकी आहे. त्यांनी कोणतेही आरोप केले, तरी त्याला आम्ही महत्व देणार नाही. केंद्रीय मंत्री भुंकायला ठेवले आहेत. नारायण राणेंची लायकी महाराष्ट्राला कळाली आहे. त्यामुळे काय चुकीचं काय बरोबर तुम्ही सांगण्याची गरज नाही,” असा सल्लाही किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

हेही वाचा – “एकनाथ शिंदेंशी तुमचं पटत नसेल, पण…”, उद्धव ठाकरेंनी ‘रुद्रांश’चा उल्लेख केल्याने उपमुख्यमंत्र्यांची नाराजी; म्हणाले…

“त्यांच्या आई-वडिलांचे ते संस्कार…”

“काँग्रेसमध्ये जाऊन लोंटागण घातले, आज त्याच काँग्रेसवर भुंकत आहे. शिवसेनेवर सगळं मिळवलं, त्यांच्यावर ते भुंकत आहे. तसेच, एखाद्या व्यक्तीच्या आजारावर ते घृणास्पद बोलत असतील तर, त्यांच्या आई-वडिलांचे ते संस्कार आहेत,” अशी शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणेंवर टीका केली.