शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना २४ दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर भर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड जखमी झाले होते. महेश गायकवाड यांना गोळीबारानंतर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन त्यांना लागलेल्या गोळ्या काढण्यात आल्या. आठ दिवस महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

आनंद दिघे माझं प्रेरणास्थान

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी टेंभी नाका या ठिकाणी जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आनंद दिघे हे माझे प्रेरणा स्थान आहेत असंही महेश गायकवाड यांनी सांगितलं. महेश गायकवाड जेव्हा कल्याणमध्ये परतले तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलं. तसंच जोरदार शक्तिप्रदर्शनही यावेळी करण्यात आलं. त्यानंतर महेश गायकवाड यांनी एक छोटं भाषण करत आपल्या भावनांना वाट करुन दिली.

boney kapoor
वडिलांच्या १० नोकऱ्या गेल्या, मुंबईत आले अन् राज कपूर यांच्या घरात नोकराच्या…; बोनी कपूर यांनी सांगितला कुटुंबाचा संघर्ष
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
Devendra Fadnavis slams jayant patil
“जयंत पाटील नाराज…”, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचे नाव घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले…
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

काय म्हणाले महेश गायकवाड?

“आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माझे सहकारी मित्र शाम शिंदे आणि मुकेश हे मला रोज विचारायचे, तुला गोळ्या लागल्या, असं काय मॅजिक झालं, तुला देव दिसला का? मी त्यांना सांगितलं हो. मला जेव्हा जखमा झाल्या तेव्हा त्याला त्रास होत होता. त्याच्या डोळ्यांत पाणी होतं आणि माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. तो माझ्या कपाळावर हात फिरवून मला सांगत होता, काळजी करु नको मी आलोय. मी बोललो, साहेब तुम्ही आल्यामुळे माझ्यात एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉ. श्रीकांत शिंदे. मला त्यावेळी कळलं की जेव्हा एका कार्यकर्त्यावर अशाप्रकारचं संकट येतं तेव्हा आपला नेता आपल्याजवळ असणं किती गरजेचं आहे.”, असं महेश गायकवाड म्हणाले.

हे पण वाचा- “आमदार गणपत गायकवाड यांनी रचलेलं षडयंत्र…”, रुग्णालयातून बाहेर येताच महेश गायकवाड म्हणाले…

गणपत गायकवाड यांनी असं करायला नको होतं..

महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यादेखील आल्या होत्या. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गणपत गायकवाड यांनी असं करायला नको होतं. त्यांनी खूप वाईट केलं. गणपत गायकवाड यांच्यावर खूप मोठी कारवाई केली पाहिजे जेणेकरुन पुन्हा अशी हिंमत कुणी करणार नाही”, अशी प्रतिक्रिया महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी दिली.