नेहमीच विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज क्रिकेटच्या मैदानात उतरून चांगलीच फटकेबाजी केली. येरव्ही राऊत भाषणातून अनेकांचा समाचार घेतात. मात्र आज त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केल्यामुळे त्यांची चर्चा होत आहे. संजय राऊत हे खेडमधील आंबेगाव येथे आले होते. येथे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे. याच ठिकाणी येऊन राऊत यांनी फलंदाजी केली.

हेही वाचा >> रोहित शर्माचा नाद करायचा नाय! गुजरातविरोधात खेळताना केली ‘ही’ अनोखी कामगिरी, मुंबईसाठी…

क्रिकेटच्या मैदानात उतरण्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “मी ऑलराऊंडर आहे. मी मुंबईचा आहे. पण आजतागायत मी क्रिकेटच्या मैदानात कधीच उतरलो नाही. क्रिकेटची मॅच सुद्धा कधी पाहिली नाही. पण मी मैदानात उतरलो की बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, पंचगिरी सर्व काही करू शकतो.”

हेही वाचा >> ज्यांनी जास्त बळी घेतले तेच संघ गुणतालिकेत टॉपमध्ये, जाणून घ्या IPL 2022 मधील वेगळं समीकरण

तसेच, “क्रिकेटच्या मैदानात भाषण म्हणजे ही एक गंमतच आहे. आयपीएल सुरुय हे बरोबर आहे. पण ही एसपीएल (क्रिकेट स्पर्धा) त्यापेक्षा कमी नाही. आयपीएलच्या मैदानात वेगवेगळे झेंडे असतात. इथं मात्र एकच भगवा झेंडा आहे. त्यामुळे हारजीत कोणाची ही झाली तरी जिंकणार भगवाच हे निश्चित आहे. मी मैदानात आल्याने पंच बुचकळ्यात पडलेत. त्यांनी सामना थांबविला आहे. आता आपण मैदानात उतरुया, मग बघू पुढे,” असे राऊत म्हणाले.

हेही वाचा >> बंगळुरु-चेन्नई सामन्यात प्रेमाचा बहर, तरुणीने गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ

त्यानंतर पत्रकार परिषद संपताच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला त्यांनी भेट दिली. राऊत थेट क्रिकेटच्या मैदानात उतरले. मैदानावर उतरत त्यांनी जोरदार फटके लगावत कार्यकर्ते आणि प्रेक्षकांची मने जिंकली.