shivsena leader sushma andhare attacks gunratna sadavarte over rss and bhikkhu sangh compare ssa 97 | Loksatta

“सदावर्तेंसारख्या अर्धंवटरावांनी…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “वकील, राजकारणी की आरएसएसचे कार्यकर्ते हे ठरवा”

Sushma Andhare Vs Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

“सदावर्तेंसारख्या अर्धंवटरावांनी…”, सुषमा अंधारेंची टीका; म्हणाल्या, “वकील, राजकारणी की आरएसएसचे कार्यकर्ते हे ठरवा”
सुषमा अंधारे, शिवसेना नेत्या (संग्रहित छायाचित्र)

‘डंके की चोट’साठी परिचीत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सदावर्ते यांनी बौद्ध भिख्खू संघाची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ( आरएसएस ) केली आहे. यावरून त्यांच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात येत आहे. हाच धागा पकडत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सदावर्तेंना ‘अर्धंवटराव’ म्हणत टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “गुणरत्न सदावर्ते हे कायम असंबंध आणि अतार्किक बोलण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भिख्खू संघ यांची तुलना होऊ शकत नाही. भिख्खू संघ अहिंसा मानणारा आहे. परदेशातील पाहुण्यांना महात्मा गांधी यांची समाधी अथवा चैत्यभूमी अथवा दीक्षाभूमी दाखवतात. स्वामी विवेकानंद यांच्या समाधीस्थळावर घेऊन जातात. परंतु, कधीही आरएसएसचे मुख्यालय दाखवण्यात येत नाही. त्यावरून आरएसएस आणि भिख्खू संघात फरक काय आहे, हे सदावर्तेंसारख्या अर्धवटरावांना कळायची गरज आहे.”

हेही वाचा – “शिवसेना का फुटली याचं उत्तर…”, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं मोठं विधान!

“आरएसएसचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या”

“यासारखी तुलना करून सदावर्तेंसारखी माणसं लोकांना चिथावणी देत, दोन समाजातं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही वकील, राजकारणी आहे हे ठरवा. आरएसएसचे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्याच्या थाटात वावरणं बंद करा,” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी सदावर्तेंना खडसावलं आहे.

काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

“जगात आरएसएस आणि भिख्खू संघ हे दोनच जागतिक विचार आहे. आरएसएस देशाच्या हितासाठी काम करत आहे. मी भारतीय संविधानासोबत आहे. हे दोन्ही विचार कधीच कोणासोबत हिंसा करणार नाही,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“शिवसेना का फुटली याचं उत्तर…”, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचं मोठं विधान!

संबंधित बातम्या

“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप
“गुवाहाटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडे पैसे कुठून आले?” चार्टर्ड विमानाच्या प्रवासावरून प्रश्नचिन्ह उपस्थित, चौकशीची मागणी
शिंदे गट भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढणार? उद्धव ठाकरेंच्या टीकेला दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर
जयंत पाटलांच्या चिरंजीवांच्या शाही विवाहाची लगबग! ; दोन लाख लग्नपत्रिका; अतिभव्य मंडप

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘विकासाभिमुख कारभारामुळे विरोधकांमध्ये जळफळाट’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
“आजचं भाषण म्हणजे वैफल्यग्रस्त…” अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!
“ताई हुशार निघाल्या” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भावना गवळींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “माझ्यावर झालेले आरोप…”
गौतमी पाटीलचा अश्लील नाच थांबवा, नाहीतर गृह मंत्रालय..; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कठोर शब्दात पत्र
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप