शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. पण अद्याप त्यांना यश येत नसल्याचं दिसत आहे. असं असताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर बोचरी टीका केली आहे. काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अशा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू असंही ते म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी माहीम विधानसभा मतदार संघांतील शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बंडखोर नेत्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

ranjitsinh naik nimbalkar marathi news
“बटन दाबले आणि समस्या सुटली, असे होत नाही…”, रणजितसिंह निंबाळकरांच्या वक्तव्याने….
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “आज माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेच्या पदाधिकाऱ्यांची, नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अजूनही मजबुतपणे काम करत आहे. येथील काही स्वार्थी लोकांनी पक्षाशी गद्दारी केली असली तरी, अद्याप माहीम मतदार संघात शिवसेना कायम आहे. ते मजबुतीने काम करत आहेत. शिवसेनेनं यापूर्वी देखील अशी गद्दारी पचवली आहे. पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू” अशा शब्दांत विनायक राऊत यांनी टीका केली आहे.