scorecardresearch

“लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी…”; फडणवीसांचा धावातानाचा जुना फोटो शेअर करत शिवसेना आमदाराचा टोला

आपण ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडली तेव्हा तिथे उपस्थित होतो पण शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता, असं फडणवीस म्हणालेले.

Shivsena MLA Slams Devendra fadnavis
फेसबुक पोस्टवरुन साधला निशाणा (फाइल फोटो)

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्याच्या श्रेयवादावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. प्रमुख सत्ताधारी पक्ष असणारा शिवसेना आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने मुंबईमधील सोमय्या मैदानावर आयोजित केलेल्या बुस्टर सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनामधील शिवसेनेच्या सहभागासंदर्भात प्रश्न उपस्थित करत टीका केली होती. आपण ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी पाडली तेव्हा तिथे उपस्थित होतो पण शिवसेनेचा एकही नेता किंवा शिवसैनिक त्या ठिकाणी नव्हता असा दावा फडणवीस यांनी जाहीर सभेमधून केलाय. या दाव्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना उत्तर दिलेलं असतानाच सध्या शिवसेनेच्या एका आमदाराची पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> ‘सरड्यासारखे रंग’, ‘सुपारी’, निवांत सभा अन् नक्कल करत म्हणाले “काय एकदाचं…”; अजित पवारांची राज ठाकरेंविरोधात टोलेबाजी, बॉडीगार्ड्सही लागले हसू

फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मुंबईत रविवारी महाराष्ट्र दिनानिमित्त सोमय्या मैदानावर जाहीर सभा घेऊन भाजपाने शक्तिप्रदर्शन केले. बाबरी पाडली तेव्हा मी तेथे होतो असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदूत्वाच्या मुद्यावरून जोरदार टीकेचा मारा केला. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो, अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली. “हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्याकरिता तिथे होता. या राम मंदिरासाठी बदायूच्या सेंट्रल जेलमध्ये या देवेंद्र फडणवीसनं घालवले,” असं फडणवीस यांनी भाषणात म्हटलंय. मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. “मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली, आणि हे सांगतात आम्ही बाबरी मशीद पाडली,” असं विधान फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका करताना केलं.

बाबरी पाडली, त्याबद्दल ज्या ३२ जणांना आरोपी केले होते, त्यात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकाही नेत्याचा समावेश नाही, ते सर्व भाजपचे नेते होते, असे त्यांनी सांगितले. परंतु ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लाऊन उद्धव ठाकरे सत्तेत बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

नक्की वाचा >> ‘फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर…’, शिवसेनेचा राज ठाकरेंवरही निशाणा; म्हणाले, “मतपरिवर्तनामागे नक्की कोणता…”

शिवसेनेच्या आमदाराने शेअर केला तो फोटो
औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांचा काही वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. “लाठीचार्ज झाला की पळणारे… म्हणे बाबरी पाडायला गेला होता,” अशा कॅप्शनहीत दानवे यांनी एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस हे पळताना दिसत आहेत. हा फोटो नेमका कधीचा आहे हे स्पष्ट नसलं तरी फडणवीस यांच्यावर राज्यातील राजकारणामध्ये मोठी जबाबदारी सोपवण्याआधी ते कार्यकर्ता म्हणून आंदोलन करताना एका आंदोलनाच्या वेळी काढण्यात आलेला फोटो असल्याचं सांगितलं जात आहे. या फोटोत भाजपाच्या काही कार्यकर्त्यांसहीत फडणवीस पळताना दिसत आहेत.

राऊतांचाही टोला
दरम्यान, बाबरी प्रकरणावरुन शिवसेनेला सवाल विचारणाऱ्या फडणवीसांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर दिलंय. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करत राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले. शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.

नक्की वाचा >> “१८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे…”; बाबरी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना नेते खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले यांच्यासह अनेक नेते व शिवसेना कार्यकर्ते राममंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना भवनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. माझी अयोध्या खटल्यात चार वेळा साक्ष झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसेना नेत्यांवर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena mla ambadas danve slams devendra fadnavis over babri issue scsg

ताज्या बातम्या