सत्तेल असलेल्या शिवसेनेतील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून मोठी धुसफूस होत आहे. विदर्भातील एका आमदाराने उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं मिळाली, पण ४ वेळा निवडून येऊन देखील आम्हाला डावलल्या जात आहे. अशी नाराजी शिवसेना आमदार आशिष जैसवाल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिवसेनेत खिंडार पडणार का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आला आहे. काल शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी देखील राजीनामा दिला आहे.

आशिष जैसवाल म्हणाले, “चार ४ वेळा निवडून येऊन देखील पक्षात सन्मान मिळत नाही. पक्षानं संधी न दिल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदं पण जुण्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. संधी मिळत नसल्याने मनात दु:ख आणि वेदना आहेत.” ते टीव्ही नाईन मराठीशी बोलत होते.

तो निर्णय मी स्विकारलेला आहे

“जेव्हा मागच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होता. तेव्हा सुद्धा मी एकच शब्द वापरला होता की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो निर्यण मी मान्य करेल. मंत्रीमंडळाबाबत कुठंलही नाराजीचं वक्तव्य मी केलेलं नाही. मात्र हे सत्य आहे की येवढं वर्ष काम करुन सुद्धा आपल्याला संधी मिळायला पाहिजे, असं कार्यकर्त्यांना वाटतं. परंतु शेवटी कोणाला मंत्री करावे आणि कोणाला करु नये, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो आणि तो निर्णय मी स्विकारलेला आहे.” असे आमदार जैसवाल म्हणाले.

हेही वाचा- “२०१४ प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये यासाठीच….,” नाना पटोलेंनी पुन्हा एकदा साधला राष्ट्रवादीवर निशाणा

काम करणाऱ्या लोकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही

ही नाराजी पक्षश्रेष्ठींजवळ पोहचवण्याबाबत आशिष जैसवाल म्हणाले, “तिन पक्षांचे सरकार स्थापण झाल्यानंतर अनेक अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद द्याव लागलं. त्यामुळे काही प्रमाणामध्ये माझ्यासारख्या वर्षानुवर्षे काम करणाऱ्या लोकांना पक्ष न्याय देऊ शकला नाही. ही बाब सत्य आहे की या सर्व परीस्थितीमध्ये मनाला कुठेतरी वेदना होतात, दु:ख होते. हे दु:ख आपल्या नेत्यांपुढे मांडणं हा माझा धर्म आहे. जेव्हा मला संधी मिळते तेव्हा मी माझ्या व्यथा आणि अडचणी व्यक्त करत असतो, यात लपवण्यासारखे काही नाही.”

हेही वाचा- शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम; म्हणाले…

तेव्हा विदर्भाला पक्षप्रमुख न्याय देतीलचं

“अजून काही सर्व संपलेलं नाही आहे. आता एक मंत्रीपद होतं पण काही कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला. आता जेव्हा विस्तार होईल तेव्हा विदर्भाला पक्षप्रमुख न्याय देतीलचं. ११ जिल्ह्यांमध्ये एकही मंत्री ठेवणार नाहीत, अशी शक्यता नाही. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो विचारपूर्वक घेतील. तसेच तळागाळीतल कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका योग्यवेळी पक्षप्रमुख घेतील,” असा मला विश्वास असल्याचे आमदार आशिष जैसवाल म्हणाले.