उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही. उद्धव ठाकरे यांना आपण मागील ३९ वर्षांपासून ओळखतो, अगदी लहान असल्यापासून त्यांना पाहिलं आहे. त्यांना काहीही येत नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली होती. या टीकेला शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी नारायण राणेंवर हल्लाबोल केला आहे. “नारायण राणेंनी मातोश्रीच्या अंगणात चाफा फुलेल की नाही, याची चिंता करु नका. परंतु, तुमच्या अंगणात दोन धतुरे उगवले आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या,” अशा शब्दांत मनीषा कायंदे यांनी नितेश राणे आणि निलेश राणेंवरही निशाणा साधला आहे.

Chandrashekhar Bawankule on Gajanan Kirtikar
‘विरोधकांच्या मागे लागणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत
pm narendra modi (2)
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना प्रत्युत्तर, “औरंगजेब हे १०४ थं दुषण…”

हेही वाचा – शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…”

“महाराष्ट्र कसं सहन करत होता?”

“त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली होती. पण हे सगळं महाराष्ट्र कसं सहन करत होता? हेच मला कळत नाही. त्या माणसाला काहीच येत नाही. मी ३९ वर्षे त्या माणसाला जवळून पाहिलं आहे. अगदी लहान असल्यापासून पाहिलं आहे. त्याला काहीही येत नाही,” अशी टीकाही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.