रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत हे महाविकास आघाडीच्यावतीने लोकसभेच्या मैदानात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसेनेही महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे राज ठाकरे यांची कोकणात सभा होणार असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. “राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी फटाके आहेत. त्यामुळे कोकणात काहीही फरक पडणार नाही”, असे विनायक राऊत यांनी म्हटले. विनायक राऊतांनी केलेल्या टीकेला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : “मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवलं”, रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांचं मोठं विधान!

संदीप देशपांडे काय म्हणाले?

“आम्ही फुसकी लवंगी आहे की, इलेक्ट्रिक माळ आहे, की अॅटमबॉम्ब आहे, हे ४ तारखेला ज्याच्या त्याच्या लायकी प्रमाणे कळेल. मात्र, यांचा फुगा फाटलेला आहे. उद्धव ठाकरे रोज फुग्यात हवा भरतात. पण यांचा फाटलेला फुगा हवा सोडत आहे. त्यामुळे फाटलेल्या फुग्यांनी आमच्याबाबत बोलण्याची गरज नाही”, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी विनायक राऊत यांचा समाचार घेतला.

विनायक राऊतांचा विरोधकांवर निशाणा

विनायक राऊत यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, “माझे डिपॉझीट जप्त होईल असे बोलत आहेत. त्यांना जर त्याचे समाधान मिळत असेल तर बोलूद्या. त्यांना चार जून पर्यंत चांगली झोप लागेल. मात्र, चार जूननंतर त्यांची झोप उडेल”, असा निशाणा विनायक राऊत यांनी विरोधकांवर साधला.