scorecardresearch

पडघा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक

आधी रस्त्यावरच्या समस्या संपवा तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली आहे

छायाचित्र-दीपक जोशी

पडघा टोल नाक्यावर विविध मागण्यांसाठी शिवसेनेने हल्लाबोल आंदोलन केले आहे. शेकडो शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त आहे. नाशिक महामार्ग, काही ठिकाणचा भुयारी मार्ग, सर्व्हिस रोडची अपुरी कामे तसेच खड्डे या समस्या आधी संपवा तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या आंदोलनाला शेकडो शिवसैनिकांची हजेरी आहे. या आंदोलनामुळे नाशिकला जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाताना पडघा नावाचे गाव लागते. या ठिकाणी टोल नाका आहे. या टोलनाक्यावर येत शिवसैनिकांनी आंदोलन केलं. टोल घेऊनही रस्ते सुधारले जात नाहीत, अनेक ठिकाणी बांधकामे अपूर्ण आहेत. खड्डयांची समस्या मिटलेली नाही. आधी या सगळ्या समस्या दूर करा तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

 

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena protest at padgha toll naka for various demands