राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावरून टीका केली आहे.

यानंतर आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाच्या एकूण २० नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही, याच मुद्द्यावरून चतुर्वेदी यांनी नवीन सरकावर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीसाठी महिला सन्मान किंवा महिला सशक्तीकरण केवळ शब्दांपुरतं मर्यादीत आहे. कृती करण्याची वेळ येते तेव्हा भाजपामधील महिलाविरोधी विचार समोर येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. त्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी

हेही वाचा- संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. सरकारमध्ये ‘महिला व बाल कल्याण’ विभाग असतो, याची जबाबदारी कुणाला मिळेल? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या की, मला पूर्ण विश्वास आहे, महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, शिंदे गटाच्या नेत्या यामीनी जाधव, अपक्ष आमदार गीता जैन, पंकजा मुंडे अशा अनेक महिला नेत्या असताना, एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड यांना मिळेल.

हेही वाचा- “ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

खरंतर, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ यांनी केला होता. या मुद्द्यावरून भाजपानं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला होता. पण तेच संजय राठोड हे आता शिंदे गटात सामील झाले असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालं आहे.