"महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील" शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची उपरोधिक टोलेबाजी! | Shivsena Rajyasabha MP priyanka chaturvedi on cabinet expansion and sanjay rathod rmm 97 | Loksatta

“महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील” शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींचा उपरोधिक टोला!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे.

“महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील” शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींचा उपरोधिक टोला!
संग्रहित फोटो

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला असून शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रीमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड यांनाही मंत्रीपद मिळालं आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील यावरून टीका केली आहे.

यानंतर आता शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाच्या एकूण २० नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही, याच मुद्द्यावरून चतुर्वेदी यांनी नवीन सरकावर टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीसाठी महिला सन्मान किंवा महिला सशक्तीकरण केवळ शब्दांपुरतं मर्यादीत आहे. कृती करण्याची वेळ येते तेव्हा भाजपामधील महिलाविरोधी विचार समोर येतात, अशी टीका त्यांनी केली आहे. त्या ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.

हेही वाचा- संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये एकाही महिलेला स्थान मिळालं नाही. सरकारमध्ये ‘महिला व बाल कल्याण’ विभाग असतो, याची जबाबदारी कुणाला मिळेल? असा प्रश्न विचारला असता, प्रियांका चतुर्वेदी उपरोधिक टोला लगावत म्हणाल्या की, मला पूर्ण विश्वास आहे, महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड सांभाळतील. भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, शिंदे गटाच्या नेत्या यामीनी जाधव, अपक्ष आमदार गीता जैन, पंकजा मुंडे अशा अनेक महिला नेत्या असताना, एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाची जबाबदारी संजय राठोड यांना मिळेल.

हेही वाचा- “ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

खरंतर, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन मंत्री संजय राठोड हेच पूजा चव्हाण यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ यांनी केला होता. या मुद्द्यावरून भाजपानं महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घेतला होता. पण तेच संजय राठोड हे आता शिंदे गटात सामील झाले असून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदही मिळालं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संजय राठोडांच्या मंत्रीपदावरून मनिषा कायंदे यांचं चित्रा वाघ यांना आवाहन; म्हणाल्या…

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात ‘बब्बू’
Fifa World Cup 2022: संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी
मुंबई: टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी अटकेत
मुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत?
Video: कुशल बद्रिकेची सिंघम स्टाइल एन्ट्री अन् सरु आजीचे डायलॉग ऐकून रणवीर सिंग पोट धरुन हसला, व्हिडीओ व्हायरल