गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तेच्या महानाट्यावर आज पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीच यासंदर्भातले सूतोवाच केले असून त्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ शी बोलताना उद्धव ठाकरेंना निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. आजही आम्ही परत यायला तयार आहोत, उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, असं केसरकर म्हणाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी तोडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची अट बंडखोर आमदारांनी घातली आहे.

‘गद्दार’ म्हणण्यावर केसरकर संतप्त

बंडखोरी केल्यामुळे एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी या आमदारांचा ‘गद्दार’ म्हणून देखील उल्लेख केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला गद्दार म्हणण्याचा एकाही शिवसैनिकाला अधिकार नाही. आम्ही हे वारंवार सांगितलं आहे. मी आजही सांगतो की अजूनही निर्णय द्या, आमची परत यायची तयारी आहे. २०-२१ आमदार आमच्या संपर्कात आहेत असं उगाच सांगू नका. एक-दोन लोकांची नावं सांगा, त्यांनाही मुंबईत आणून पोहोचवतो. आम्ही मांडलेली भूमिका शिवसेनेच्या हिताची आहे. किती वेळा हात जोडायचे यालाही मर्यादा आहेत”, असं केसरकर म्हणाले.

Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
pankaja munde manoj jarange
“मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

“उद्या जर कुणी मला गद्दार म्हटलं, तर त्या शिवसैनिकांना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार मला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना जसं मी पत्र पाठवलं, तसंच पत्र सगळ्या शिवसैनिकांना पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. आम्हाला कुणी गद्दार म्हणायला लागलं, डुकरं, मेलेली प्रेतं, घाण, पिकलेली पानं म्हणायला लागलं, तर ते कोण सहन करणार?” असा सवाल देखील दीपक केसरकरांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम!

दरम्यान, यावेळी बोलताना दीपक केसरकरांनी अप्रत्यक्षपणे या सगळ्या गोंधळाचा आज शेवटचा दिवस असल्याचा अल्टिमेटम उद्धव ठाकरेंना दिला आहे. “आज माझ्या दृष्टीने शेवटचा दिवस आहे. आमच्या पक्षप्रमुखांचं आज जे स्थान आहे, त्यांचा मान राखून राज्यात काहीतरी चांगलं घडलं पाहिजे अशी इच्छा होती. पण ते आपल्या विचारांशी ठाम आहेत. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आजचा हा कदाचित शेवटचा दिवस असेल जेव्हा मी हे आवाहन करू शकेन”, असं केसरकर म्हणाले.

Maharashtra Political Crisis Live : मुंबई…दिल्ली…गुवाहाटी… सत्तास्थापनेच्या चर्चांनंतर राजकीय घडामोडींना वेग!

“आमच्या आवाहनाचा विचार होणार नसेल आणि उद्या आम्हाला जायला लागलं, अविश्वास ठरावावर मतदान करावं लागलं, तर ते मतदान उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसेल, एवढंच आमचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा, असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. सुरुवातीला भाजपासोबत बोलणी फिसकटल्यानंतर आम्ही सगळे आमदार त्यांच्यासोबत उभे होतो. नंतर जी परिस्थिती उद्भवली, ती त्यांच्यासमोर वेळोवेळी मांडली आहे”, असंही केसरकरांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

“शिवसेनेची अवस्था म्हणजे एक टुकडा इधर, एक टुकडा उधर आणि उद्धव ठाकरेंकडे…”, किरीट सोमय्यांचा खोचक टोला!

“उद्या राज्यपालांनी सांगितलं की या सरकारचं बहुमत गेलं आहे, विश्वासदर्शक ठराव आणा, तर आणायलाच लागेल”, असंही केसरकरांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांवर साधला निशाणा!

दरम्यान, यावेळी बोलताना केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “शरद पवार प्रत्येक मतदारसंघात गेले आहेत. तिथे तुमचा पुढचा आमदारकीचा उमेदवार तुम्ही जाहीर केला आहे. आमच्या खासदारांच्या मतदारसंघात तुम्ही तुमचे उमेदवार जाहीर केले आहेत. राज्याच्या जनतेनं तुम्हाला निवडणुकीत हरवल्यानंतरही तुम्ही शिवसेनेमुळे सरकारमध्ये असाल, तर त्या शिवसेनेला संपवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? आणि जर आम्ही बुडत असू, तर आम्हाला वाचवण्याचं आमच्या पक्षप्रमुखांचं कर्तव्य नाही का?”, असा परखड सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.