धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीनं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू नये, म्हणून केदार दिघेंनी तिला धमकावल्याचा आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी आता शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा त्यांनी काय गुन्हा केलाय, हे जास्त महत्त्वाचं आहे, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका!

हेही

मंगळवारी केदार दिघे यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला आहे, ते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, याबाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे? असं विचारलं असता शिरसाट म्हणाले की, “ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा त्यांनी काय कृत्य केलं, हे जास्त महत्त्वाचं आहे. कोण-कोणाचा मुलगा आहे किंवा कोण-कोणाचा पुतण्या आहे, यावर न्यायालय चालत नाही किंवा पोलीस यंत्रणा चालत नाहीत. तुम्ही गुन्हा केला असेल तर तुमच्यावर गुन्हा नोंद होईल आणि तुमच्यावर योग्य ती कारवाईदेखील होईल. गुन्हा केला नसेल तर तुमची निर्दोष मुक्तता होईल” असंही शिरसाट म्हणाले.

नेमकं प्रकरण काय आहे?
केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर यानं धनादेश देण्यासाठी पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने याबाबत तक्रार करू नये, म्हणून केदार दिघे यांनी तिला धमकावलं आहे, असा आरोप पीडित तरुणीनं केला आहे.

हेही वाचा- केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित कपूर याच्यासह केदार दिघे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिघे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) तर मित्र रोहित कपूर याच्याविरोधात कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena rebel mla sanjay shirsat on kedar dighe threat rape victim rmm
First published on: 03-08-2022 at 13:36 IST