आम्ही ५० कोटी घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घऱी बसेन असं आव्हान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलं आहे. संजय राऊत यांनी प्रत्येक आमदाराला ५० कोटी मिळाले असून ईडीने चौकशी करावी असं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींनंतर शंभूराजे देसाई आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शंभूराजे देसाई यांनी यावेळी संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“…तर मातोश्रीवर परत जाऊ,” बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

“संजय राऊतांमुळेच शिवसेना फुटली त्यामुळे त्यांना महत्त्व देत नाही. शरद पवार जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यांनी महाविकास आघाडी सरकार २५ वर्ष टिकेल असं सांगितलं होतं, पण अडीच वर्षात हे सरकार गेलं. आता शरद पवार म्हणत आहेत मध्यावधी लागणार, पण तसं होणार नाही,” असं शंभूराजे देसाई म्हणाले आहेत.

शिंदे गटातील बंडखोर आमदार शंभूराजे देसाई संजय राऊतांवर संतापले; पवारांवरही टीका करत म्हणाले, “ते बोलले म्हणून…”

प्रत्येक आमदाराला ५० कोटी दिल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी पुरावा आहे का? अशी विचारणा केली. पैसे घेतल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून घरी बसेन असंही ते म्हणाले. आम्ही शिवसेनेत आहोत, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललो आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“मैदान आता जास्त दूर नाही. अडीच वर्षानंतर निवडणुका होतील तेव्हा परिस्थिती समोर येईल. आमच्या नेत्याने एकाही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही असा शब्द दिला असून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे,” असं शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena shambhuraje desai challenge to sanjay raut over allegations of 50 crore sgy
First published on: 06-07-2022 at 14:20 IST