शिवसेनेनं एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांच्या गटाला डबक्याची उपमा देत त्यामधून बाहेर पडावं असं आवाहन या ३९ आमदारांना केलंय. त्याचप्रमाणे शिवसेनेनं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावरही कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राष्ट्रवादीतूनच शिवसेनेत आले व मंत्री झालेले अनेक आमदार आज राष्ट्रवादीवरच टीका करत असल्याचा टोलाही शिवसेनेनं बंडखोर आमदारांना लागवला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेनं या बंडखोर गटाची तुलना पाकिस्तानशी केली असून पाकिस्तान ज्याप्रमाणे डबकं झालाय तसच या गटाचं होणार आहे, असा दावा शिवसेनेनं केलाय. शिंदे गटाला महाशक्तीचा अजगरी विळखा गिळून टाकेल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “एका बाजूला आपल्या पुत्राने…” मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवहानानंतर आदित्य, राऊतांच्या वादग्रस्त विधानांवरुन शिंदेंचा सवाल

“शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात २८० सेना निर्माण झाल्या. अमुक सेना किंवा तमुक सेना वगैरे, पण गेली ५६ वर्षे टिकली ती फक्त शिवसेनाच! गुवाहाटीमध्ये ‘डोंगर, झाडी, नदी, हाटील’ची मजा घेत जे आमदार बसले आहेत, त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व ‘हाटील, डोंगर, झाडी’त बसलेल्या आमदारांवर ११ तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. हा एक प्रकारे ‘दिलासा’च आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण ते भविष्यात उघड होईलच,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलंय.

sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल

“विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ यांनी झाडीत बसलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे सर्वोच्च न्यायालय म्हणते. म्हणजे विधानसभेचे अधिवेशन ११ जुलैनंतरच घेता येईल. तोपर्यंत आमदारांना ‘डोंगर-झाडी-हाटील’मध्येच राहावे लागेल. या सगळ्या परिस्थितीत भाजपा नक्की कोठे आहे? भाजपा म्हटलं तर सर्वत्रच आहे, पण कुठेच नाही! त्यांचे काम नारदमुनीप्रमाणे चालते. सुधीर मुनगुंटीवारांसारखे नेते विजयाची दोन बोटे नाचवत आपल्या गाडीतून फिरत आहेत. भाजपा आपल्या मित्रांचा, सहकारी पक्षांचा ‘घास’ गिळूनच शांत होतो हे आता झाडीतल्या आमदारांना व नेत्यांना लवकरच कळेल. या आमदारांच्या गटास महाशक्तीचा अजगरी विळखा पडला आहे. हा अजगर अख्खा बोकड गिळावा तसे या गटास गिळून पुढे जाईल,” असं शिवसेनेनं शिंदे गट आणि भाजपा युतीसंदर्भात भाकित वर्तवताना म्हटलंय.

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

“सुप्रीम कोर्टाच्या कालच्या निकालानंतर झाडी-डोंगरातील आमदारांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली- “हा बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे!’’ शाब्बास पठ्ठ्या! आनंद दिघे हे एक निष्ठावान, कडवे शिवसैनिक होते व बाळासाहेबांचा विचार हाच त्यांचा श्वास व ध्यास होता. जीवनभर त्यांनी कोणत्याही पदाची आस धरली नाही. रंजल्या-गांजल्यांचे ते वाली होते. त्यामुळे त्यांच्या कोणत्या विचारांचा विजय झाला?,” असा खोचक सवाल शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना विचारलाय.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”

“गद्दारी करणाऱ्यांना विरोध करणारा शिवसैनिक प्रल्हाद सावंत याच्यावर झाडीतल्या आमदारांच्या भाडोत्र्यांनी हल्ला केला हादेखील ठाकरे-दिघेंच्या विचारांचा विजयच समजावा का? शिवसेनेवर होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी लढणाऱ्या संजय राऊतांवर व्यवस्थित टायमिंग साधून ‘ईडी’चे समन्स पाठवले गेले, हासुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा विजय मानायचा का? आमदार त्या झाडी-झुडुपांतून सांगत आहेत, ‘‘आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही कुठे शिवसेना सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो!’’ पण या बोलघेवड्यांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले व मंत्री झाले. आता त्यांचे बोल काही असू द्यात. शरद पवारांना ते नेते मानतच होते व ‘‘पवारांसारखा नेता होणे नाही’’ असे गौरवोद्गार काढीत होते. मात्र आता त्यांना महाशक्तीच्या अजगरी विळख्याने गिळले व त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची झाडी-झुडुपे, शिवसेना आवडेनाशी झाली,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

“महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठेने काम करणार आहात का? रामाचे नाव घेता व रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.

“श्रीराम ही मोठीच शक्ती आहे. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।… रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।… रामान्नस्ति परायणं परतरं रामस्य दासोस्म्यहम्।… रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर।… म्हणजेच रावण कितीही बलवान असला तरी विजय प्रभू रामचंद्राचाच होतो हे महत्त्वाचे. महाराष्ट्राचे मंत्री त्यांची खाती सोडून, आमदार त्यांचे मतदारसंघ सोडून ‘झाडी-झुडुपांत’ बसले आहेत. याविरोधातही न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्यांची खाती काढून घेतली, पण हे बिनखात्याचे मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा देतील तर शपथ,” अशी टीकाही शिवसेनेनं केलीय.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

“११ जुलैपर्यंत या झाडी-झुडुपांतील आमदारांना गुवाहाटीतच राहावे लागेल व उद्या महाराष्ट्रात केंद्रीय सुरक्षा घेऊन परतले तरी उंदरांप्रमाणे बिळातच लपून राहावे लागेल, अशा प्रकारची चीड व संताप महाराष्ट्रीय लोकांत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे या परिस्थितीत मुख्यमंत्रीपदाची आस धरून बसले असतील तर त्यांना आधी महाराष्ट्रात धुमसणाऱ्या आगीशी सामना करावा लागेल. भाजपा हा किती सत्तापिपासू पक्ष आहे व त्यासाठी त्यांनी ‘महाराष्ट्र रक्षक’ शिवसेना फोडली याचा काळा इतिहास लिहिला जाईल,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

“देवेंद्र फडणवीस यांची ही कृती त्यांच्यावरच उलटेल व भाजपाचा टांगा महाराष्ट्रात पलटेल हे आजचे वातावरण आहे. राज्यसभा, विधान परिषदा गद्दारांच्या मदतीने जिंकल्या, पण शेवटी लोकभावना तीव्र आहेत. शिवसेनेतून जे फुटले ते टिकले नाहीत. भुजबळांना शरद पवारांनी व राणेंना भाजपाने आधार दिला नसता तर त्यांचे काय उरले असते? स्वतःचे सत्त्व आणि अस्तित्वच हे लोक गमावून बसले. भारत तोडून बॅ. जीनाने पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था या बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. म्हणून ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे,” असं आवाहन शिवसेनेनं बंडखोर आमदारांना केलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय?

“गुवाहाटीमध्ये ‘झाडी-डोंगर-हाटील’ वगैरे आहे, पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे व भाजपाने या डबक्यात उडी मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंचावन्नचे एकशे पंचावन्न करण्याची ताकद ‘मऱहाटी’ मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.