scorecardresearch

“भारतीय जुगार पार्टी म्हणजे भाजपा, कारण..”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेलाही संजय राऊत यांनी दिलं प्रत्युत्तर

sanjay raut devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया.

भाजपा म्हणजे भारतीय जुगार पार्टी आहे असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी जी टीका केली ती योग्यच आहे. मी मनोरुग्ण आहे कारण महाराष्ट्राच्या हिताचा विचार आम्ही करतो. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण आहोतच. आम्ही मुंबईसह महाराष्ट्र भांडवलदारांच्या घशात घालण्याला विरोध करत आहोत. एका उद्योगपतीला मुंबई विकण्याला विरोध केल्यामुळे आम्ही मनोरुग्ण वाटत असू तर आम्ही आहोत मनोरुग्ण असंही संजय राऊत म्हणाले. तसंच मनोरुग्ण कोण आहे? ते लवकरच समजेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

कॅसिनोमध्ये काय कुणी सँडविच खायला जात नाही. मकाऊ, बँकॉक हे काही थंड हवेचं ठिकाण नाही. अशा ठिकाणी जाऊन बसणं हा काही गुन्हा नाही. मी कुठे म्हटलं गुन्हा आहे? पण जाऊन तुम्ही खोटं बोलत आहात. मकाऊला मी पण जाऊन आलो आहे. एक गाव कसं उभं राहतं आहे ते मी पाहिलं आहे. आपण जबाबदार लोक आहोत. इथे येऊन आम्हाला ज्ञान दिलं जातं आहे. भाजपाला हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती. प्रत्यक्षदर्शी असं सांगतो त्या रात्री फोटोतल्या व्यक्तीने साडेतीन कोटींचे पोकर्स विकत घेतलं. पोकर्स ही तिथली करन्सी आहे. त्यांच्यापुढे पोकर्स आहेत. मला ते माहीत नव्हतं. माझ्याकडे २७ फोटो आणि व्हिडीओ आहे. आणखी एक महाशय होते त्यांनीही दोन कोटींचे पोकर्स विकत घेतले आहेत. आता भाजपाच्या लोकांना अच्छे दिन आले असतील.

jayant patil on chandrashekhar bavankule, jayant patil criticize chandrashekhar bavankule, invitation given to rahul gandhi to come baramati
“…तर बावनकुळेंना दारोदारी का फिरावे लागत आहे?”, जयंत पाटील यांचा टोला
Aditya-Thackeray-Uday-Samnat
“हा आहे माझ्या लंडन दौऱ्याचा खर्च, आता…”, उदय सामंत यांच्याकडून हिशोब मांडत विरोधकांना उत्तर
shrikant shinde rohit pawar
कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांचा पत्ता कट होणार? रोहित पवारांचा मोठा दावा; म्हणाले…
anil parab rahul narvekar
“सुप्रीम कोर्टानं दट्ट्या दिला आणि…”, अनिल परब यांचं राहुल नार्वेकरांवर टीकास्र; म्हणाले, “थातुर-मातुर…!”

दीडदमडीची टोळधाड कशाला सोडता?

मी काही कुणाला म्हणालो आहे का? जे छायाचित्र समोर आलंय त्यात त्या महाशयांचं कुटुंब आहे का? दीडदमडीची टोळधाड आमच्यावर का सोडत आहात? इतकं तुमचं मन तुम्हाला का खातं आहे? त्यामुळे माझ्यावर, आमच्या सहकाऱ्यांवर टोळधाड का सोडत आहात? लंडनला महाराष्ट्रातल्या आमदारांचं शिष्टमंडळ गेलंय. तिथे लोकांना वाटलं की अशा प्रकारे अभ्यास करावा ते करु शकतात. आमचा आक्षेप नाकारण्यावर आहे.

मोदी आणि आदित्य ठाकरेंचा ब्रांड एकच

आदित्य ठाकरेंचा जो फोटो पोस्ट केला आहे त्यात नीट बघा. तो ग्लास आहे की डाएट कोकचा कॅन आहे? एकदा नीट बघा. मी काल त्यावर उत्तर दिलंय. मोदींचे किती फोटो दाखवू? मोदी जे पितात तोच ब्रांड आहे. डाएट कोक आदित्य ठाकरे पित आहेत. हे दिसत असताना हे लोक इतके घाबरले की त्यांना फोटो पोस्ट करताना भान राहिलेलं नाही. ईडी आणि सीबीआय यांच्या हातात नसतील तर यांच्यासारखे डरपोक लोक नाहीत. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणीही तोंडपाटिलकी करु नये हिंमत असेल तर समोर या असंही आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.

भाजपा ही भारतीय जुगार पार्टी आहे. हे (भाजपा) वेडे लोक आहेत. भाजपासारख्या लोकांच्या विरोधात आम्ही लढतोय म्हणून त्यांना आम्ही विकृत वाटत असू काही हरकत नाही. आम्ही जर गोष्टी काढायला गेलो तर देश सोडून निघून जातील. भारतीय जुगार पार्टी अर्थात गँबलिंग करणं हेच यांचं ध्येय आहे. नैतिकतचे धडे दुसऱ्यांना शिकवत असतात. मात्र यांच्यासारखी भ्रष्ट पार्टी दुसरी नाही असंही राऊत म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena thackeray group mp sanjay raut slams bjp called them bhartiya jugar party scj

First published on: 21-11-2023 at 10:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×