शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. एकीकडे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना दुसरीकडे बंडखोरीमुळे पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकर ‘ट्रबल शूटिंग’ मोडवर आल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात राज्यभरातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेताना दिसत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका सूचक विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली आहे. पक्षातून नेतेपदी असणारी अनेक ज्येष्ठ मंडळी शिंदे गटात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी नव्याने काही नियुक्त्या केल्या. यामध्ये अरविंद सावंत यांना शिवसेना नेतेपदी बढती देण्यात आली. मात्र, त्यांच्यासोबतच भास्कर जाधव यांना देखील शिवसेना नेतेपद दिल्यावरून टीका-टिप्पणी सुरू झाली होती. मात्र, त्यासंदर्भात बोलताना आता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना नेतेपदी बढती दिल्याचाही उल्लेख केला. “तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय, की गणेशोत्सवाच्या दिवसांतही तुम्ही आलात. भास्कर जाधव, तुम्हालाही शुभेच्छा देतो. तुमच्याकडून माझ्यासह तमाम शिवसैनिकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराल, अशी मला खात्री आहे. मी आता हळूहळू टीम वाढवतोय. अरविंद सावंत आणि भास्कर जाधवांना आपण नेते केलं आहे. आणखीन नेत्यांचीच नाही, पण सगळ्यांचीच टीम सावकाशपणे मी वाढवणार आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“भास्कर जाधवांना विचारपूर्वक नेतेपद दिलं आहे. कारण आता आपल्याला लढायचं आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी यावेळी सूचक विधान केलं आहे. त्यामुळे आगामी काळात भास्कर जाधव शिवसेनेकडून अधिक आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले; “मुख्यमंत्रीपद नसल्याने…!”

“बाबासाहेब पुरंदरेंनी एक गोष्ट सांगितली होती. साल्हेरचा किल्ला शिवाजी महाराजांनी जेव्हा जिंकला, तेव्हा मराठ्यांचं सैन्य जेमतेम होतं आणि मोगलांचं सैन्य लाखात होतं. तरीही महाराज जिंकले. कारण त्यांच्यासोबत मूठभर का होईना, निष्ठावंत होते. तेव्हा पसाभर असूनही निष्ठावंतांनी मोगलांना पाणी पाजलं. त्यामुळे मला निष्ठावंत हवेत. ते तुम्ही दिसता आहात. मला समाधान हे आहे की आत्ता माझ्यासोबत असणारे कट्टर, कडवट, निष्ठावान शिवसैनिक आहेत. आणि हेच आपल्या शिवसेनेचं वैभव आहे”, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.