Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले "काही तोतये..." | Shivsena Uddhav Thackeray on Shinde Faction Election Commission sgy 87 | Loksatta

Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले “काही तोतये…”

सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Thackeray vs Shinde: निवडणूक आयोगाकडे प्रकरण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य, म्हणाले “काही तोतये…”
सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यात सत्तांतर झाल्यानतंर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेलं असून, पक्षचिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं.

SC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार

“माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत. ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे. इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत. पण नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

सर्वोच्च न्यायालयात राज्याची बाजू मांडण्यासाठी १३० वकिलांची फौज; सरन्यायाधीशांच्या मुलाचाही समावेश

“दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात. शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध राहा,” असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

“आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो. पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे. लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सरस्वती पूजनावरील वादावर छगन भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले, “महापुरुषांचे फोटो बाजूला…”

संबंधित बातम्या

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
VIDEO: राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली, शिवी देत म्हणाले, “*** तू यापुढे…”
पत्नी जेवणात रोज टाकायची थोडं-थोडं विष; संपत्ती हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा, आरोपींना अटक
“बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर…”, राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवारांचा मोठा खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘कांतारा’ची तुलना ‘तुंबाड’शी करणाऱ्यांना दिग्दर्शक आनंद गांधी यांनी फटकारलं; ट्वीट करत म्हणाले…
पुणे: केंद्राकडून म्हाळुंगे-माण नगररचना योजनेसाठी निधी; विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलासाठीही अर्थसाह्य
“राज्यात फोडाफोडीचं राजकारण”, राजापुरात राज ठाकरेंचा आरोप, म्हणाले, “मला माहित आहे कोणाकोणाला…”
Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
दुर्दैवी ! ताडोबात वाघांच्या चार बछड्यांचा मृत्यू; मोठ्या वाघाने केला हल्ला की…