एकनाथ शिंदे यांना स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा टोला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे. ते रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं आव्हानही विनायक राऊत यांनी दिलं आहे.

‘रिक्षाने मर्सिडीजला मागे टाकलं’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून उत्तर; विनायक राऊत म्हणाले “त्यांच्या विद्वत्तेबद्दल…”

ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
instead of Kripal Tumane Raju Parve got Candidacy from Ramtek
शिंदेसोबत जाण्याच्या निर्णयाने तुमानेंची अवस्था ‘तेलही गेले अन् …’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी त्यांचा रिक्षाचालक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी रिक्षाच्या वेगाना मर्सिडीजला मागे टाकलं आहे असं ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं होतं. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल”.

“आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप”

“संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत?,” अशी विचारणा विनायक राऊत यांनी केली. उद्धव ठाकरेंनी शेवटच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांची नावं बदलली हे हिंदुत्वाचं प्रतिक नाही का? अशी विचारणाही त्यांनी केली. आता आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप केले जात आहेत असं ते म्हणाले.

“एकनाथ शिंदेंनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं”; विनायक राऊत संतापले; म्हणाले “धनुष्यबाण आमच्या बापाने…”

“उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

“धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही”

“धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही. आमच्या बापाने केलं आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. तुम्हाला नैतिक अधिकार नाही. हिंमत असेल तर आम्ही शिवसेना सोडली जाहीर करा,” असं आव्हान विनायक राऊत यांनी दिलं.

शिंदे गटाकडून शिवसेनेतील आमदार, खासदार संपर्क असल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी मी आमदार, खासदार कोणावरही जबरदस्ती करणार नाही सांगितलं आहे. मनापासून आहेत त्यांनीच सोबत राहा, चुकत असेल किंवा दुसरीकडे उज्वल भविष्य आहे असं वाटत असेल तर जरुरा जा असं ते म्हणाल आहेत. इतक्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभल्याचा अभिमान आहे”.