श्री सिध्देश्वर यात्रेसाठी नियोजन आराखडा राबविण्यावरून वाद; मंदिर समितीचे जेलभरो आंदोलन

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंदिर समितीने रविवारी दुपारी रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन केले.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेसाठी नियोजन आराखडा राबविण्यावरून मंदिर समिती व जिल्हा प्रशासन यांच्यात सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मंदिर समितीने रविवारी दुपारी रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी झालेले सोलापूरचे विजय देशमुख यांना पोलिसांनी अटक केली.
शहरातील हैदराबाद रस्त्यावर पालकमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे शंभर सिध्देश्वर भक्त व विविध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी देशमुख यांनी जेलभरो आंदोलनाची घोषणा केली. तेव्हा काही मिनिटांतच पोलिसांनी हस्तक्षेप करून पालकमंत्री देशमुख यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, काँग्रेसचे नगरसेवक अनिल पल्ली, पालिका स्थायी समितीचे माजी सभापती केदार उंबरजे, भाजपचे नगरसेवक अविनाश पाटील, चंद्रकांत रमणशेट्टी आदींना अटक करून त्यांची रवानगी शहर पोलीस मुख्यालयात केली.
याशिवाय शहरात पुणे व विजापूर या दोन्ही  महामार्गासह अक्कलकोट रस्ता, मंगळवेढा रस्ता आदी ठिकाणीही जेलभरो आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, भाजपचे माजी आमदार शिवशरण पाटील आदींना अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shree sidheshwar yatra solapur