shrikant-shinde-is-aggressive-over-the-governor-bhgat-shingh-koshyari-statement-about-Chhatrapati Shivaji Maharaj | Loksatta

‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक

श्रीकांत शिंदे म्हणाले. प्रत्येकाने तारतम्य बाळगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललं पाहिजे’

‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये’; राज्यपालांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानावरुन श्रीकांत शिंदे आक्रमक
शिंदे गटाचे आमदार श्रीकांत शिंदे (संग्रहित छायाचित्र)

‘ज्यांना इतिहास माहिती नाही त्यांनी यामध्ये पडू नये आणि बोलू नये. यामध्ये कोणत्याही पक्षाचा नेता असला तरी राज्यातील जनतेला अशा प्रकारची विधान मान्य होणार नाही. प्रत्येकाने तारतम्य बाळगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललं पाहिजे’, अशी आक्रमक भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिल्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात श्रीकांत शिंदेनी राज्यपालांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.

हेही वाचा- ‘राज्यपाल परत जाण्याच्या तयारीत’; आमदार भरत गोगावले यांची माहिती

सर्वांची सकाळ कोण खराब करत

तुम्ही भाषणात म्हणालात की, सकाळी उठलं की लाऊड स्पिकर सुरू होतो. नेमका कोणाचा लाऊड स्पिकर हे राज्यातील जनतेला माहिती आहे. मला नाव घेण्याची गरज नाही. सर्वांची सकाळ कोण खराब करत आहे. हे सर्वाना माहिती असल्याचे म्हणत श्रीकांत शिंदेनी संजय राऊतांना टोला लगावला. शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागत असल्याची चर्चा सुरु होत्या. श्रीकांत शिंदेनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे गटातील, कोणीही नाराज नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करतील, असे शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 22:43 IST
Next Story
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ‘समृद्धी महामार्गावरून’ एकत्र प्रवास केलेली गाडी कोणाची? काँग्रेसचा खळबळजनक आरोप; म्हणाले…