श्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात २२ किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल २ लाख ६१ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झालेत. जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व नितीन पाटील हे समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. जाळी लावून बसले असतांना, जाळ्यात मोठा मासा अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा मासा सुटण्यासाठी धडपड करत होता, ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने जाळी वर ओढली आणि जाळीसोबत माश्याला किनाऱ्यावर घेऊन आले.

जाळीत भला मोठा घोळ मासा अडकल्याचे त्यांच्या निर्दर्शनास आले. किनाऱ्यावर झालेल्या लिलावात स्थानिक व्यापाऱ्यांनी माश्याला २ लाख ६१ हजारांची बोली लावून हा मासा खरेदी केला. त्यामुळे चारही मच्छीमार मालामाल झाले आहेत.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Sakkardara flyover, Nagpur,
नागपूर : भरधाव वाहनांसह अपघाताच्या भीतीचे सावट, सक्करदरा उड्डाण पुलावर मागील वर्षात १३ अपघात
150 scrap godowns burnt down in Pimpri-Chinchwad
पिंपरी- चिंचवडमध्ये दिडशे भंगार गोडाऊन जळून खाक; १८ तासानंतरही धुमसतेय आग

घोळ हा मासा कोकण किनारपट्टीवर क्वचितच सापडतो. चविष्ट आणि गुणकारी असल्याने त्याला मोठी मागणी असते, त्याच बरोबर माश्याचे जठर आणि फुफ्फुस आदी अवयवांचा वापर शल्यचिकित्सेसाठी लागणारे धागे बनविण्यासाठी केला जात असल्याचे स्थानिक मच्छीमार सांगतात. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत हा मासा किनाऱ्या लगतच्या परीसरात आढळून येतो. या माश्याला चांगलीच मागणी असल्याच मच्छीमारांचे म्हणणे आहे.