नाशिक पदवीधरच्या उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून अर्ज भरला नाही त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांची खेळी आहे अशी चर्चा सुरू झाली त्यानंतर शुभांगी पाटील यांनी आपणीही निवडणुकीला उभं राहात असून उद्धव ठाकरे यांना भेटले आहे त्यांनी मला पाठिंबा देऊ असं आश्वासन दिलं आहे. आता त्याच नॉट रिचेबल आहेत. एकीकडे काँग्रेसने सुधीर तांबे यांच्यावरही कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोनही लागत नाहीये. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय ट्विस्ट अँड टर्न येणार हे येत्या काळात अधिक स्पष्ट होत जाणार आहे.

ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील नॉटरिचेबल; भाजपा नेते गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले…

eknath shinde bhavna gavli hemant patil
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेनं भावना गवळी, हेमंत पाटलांचं तिकीट कापलं? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
Yavatmal Washim lok sabha election 2024 constituency overview Shinde group benefit or loss of changing candidates at last minute
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?
archana patil
उमेदवारालाच ‘घडय़ाळा’ची वाढ नकोशी; उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलीत
Satyajit Patil Sarudkar
महाविकास आघाडीच्या ताकदीवर निवडून येणार; सत्यजित पाटील सरूडकर यांना विश्वास

शुभांगी पाटील अर्ज मागे घेणार का?

शुभांगी पाटील सकाळपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याने आता त्या उमेदवारी अर्ज मागे घेणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपाचे संकटमोचक असं समजले जाणारे गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांना भेटल्यावर शुभांगी पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर त्या नाशिकला परतल्या. मात्र त्या तेव्हापासून नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

मंत्री गिरीश महाजन काल रात्रीपासून नशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अशात शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त होतं आहे. शुभांगी पाटील या अज्ञात स्थळी गेल्या असल्याचंही सांगण्यात येतं आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघा काही वेळ उरला आहे. अशात शुभांगी पाटील समोर येणार का? हा प्रश्न विचारला जातो आहे.