महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – अर्जुन खोतकरांचा जावई विजय झोलविरोधात गुन्हा, क्रिप्टोच्या व्यवराहात धमकावल्याचा आरोप

Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Sunetra Pawar
बारामतीसाठी उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या “जनतेने…”
Swami Samranandji Maharaj a stalwart figure of Indian spiritual faith passed away
स्वामी स्मरणानंद यांचे अनंत प्रस्थान

काय म्हणाल्या शुभांगी पाटील?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे मी आभार मानते की त्यांनी एका सामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलीवर विश्वास ठेवला. मी हा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन आणि विजयानंतर मी मातोश्रीवर रॅली घेऊन जाणार आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली. पुढे बोलताना, नाशिक पदवीधर मतदार संघातील तरुणांचे अनेक प्रश्न आहे. ते सोडवण्यचा माझा प्रयत्न आहे. या मतदार संघात नगर जिल्ह्यात सर्वाधीक पदवीधर आहे आणि नगर जिल्हा माझे माहेर आहे. तेथील सर्व पदवीधर भाऊ एका बहिणीला माहेरची साडी म्हणून ३० तारखेला मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, शिक्षक संघटनाचा पाठिंबाही मला मिळतो आहे. टीडीएफ संघटनेचे अध्यक्षांची मी भेट घेतली आहे. मुख्यध्यापक संघटना, माध्यमिक संघटना यांच्याकडे मी पाठिंबा मागितला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – नाशिक पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणाला? अजित पवार म्हणाले, “आम्ही…”

नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी

राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक-पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघ कमलीचा चर्चेत राहिला आहे. सुरूवातीला नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर काल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. शुभांगी पाटील नेमक्या गेल्या कुठे? त्या नॉट रिचेबल का आहेत? असे प्रश्न सगळ्यांनाच पडले होते. दरम्यान काल आज सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले यांच्यामध्ये लढत होणार आहे.