scorecardresearch

सांगली: दंडोबा परिसरात आढळले आजारी सांबर, पाहा Video

भटक्या श्‍वानापासून या सांबराचा बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी त्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

sambar video
आजारी स्थितीत नर जातीचे सांबर आढळून आले (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

सांगली: मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दंडोबा वन क्षेत्रामध्ये शुक्रवारी सकाळी आजारी स्थितीत नर जातीचे सांबर आढळून आले. भटक्या श्‍वानापासून या सांबराचा बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी त्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.

मिरज पंढरपूर महामार्गालगत असलेल्या दंडोबा परिसरामध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असलेल्या मंदिरा नजीक काही नागरिकांना नर जातीचे सांबर मिळून आले. रस्त्याकडेला सांबर आढळल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही झाली होती. मात्र, गर्दी पाहूनही सांबराची हालचाल फारशी होत नव्हती यामुळे हे सांबंर आजारी असावे असे दिसत होते. नागरिकांनी याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांना दिली.

वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेउन या सांबराला ताब्यात घेउन वैद्यकीय उपचारासाठी हलविले आहे. त्याच्यावर उपचार करून व्यवस्थित बरे झाल्यानंतर पुन्हा त्याला दंडोबा परिसरातील वनामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकार्‍यांनी दिली आहे. नर जातीचे सांबर हे गेल्या सात ते आठ वर्षाचे असल्यापासून दंडोबा परिसरामध्ये वावरत आहे. वारंवार ते शेतकर्‍यांना अथवा अधिकार्‍यांना त्याचे दर्शन होत असल्याची सांगण्यात आले.

मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवरील दंडोबा वन क्षेत्रामध्ये आजारी स्थितीत सांबर आढळून आले असून भटक्या श्‍वानापासून त्याचा बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी त्याला वन विभागाच्या ताब्यात दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 19:09 IST

संबंधित बातम्या