सांगली: मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दंडोबा वन क्षेत्रामध्ये शुक्रवारी सकाळी आजारी स्थितीत नर जातीचे सांबर आढळून आले. भटक्या श्वानापासून या सांबराचा बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी त्याला पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
मिरज पंढरपूर महामार्गालगत असलेल्या दंडोबा परिसरामध्ये वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असलेल्या मंदिरा नजीक काही नागरिकांना नर जातीचे सांबर मिळून आले. रस्त्याकडेला सांबर आढळल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही झाली होती. मात्र, गर्दी पाहूनही सांबराची हालचाल फारशी होत नव्हती यामुळे हे सांबंर आजारी असावे असे दिसत होते. नागरिकांनी याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांना दिली.
वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेउन या सांबराला ताब्यात घेउन वैद्यकीय उपचारासाठी हलविले आहे. त्याच्यावर उपचार करून व्यवस्थित बरे झाल्यानंतर पुन्हा त्याला दंडोबा परिसरातील वनामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती वन अधिकार्यांनी दिली आहे. नर जातीचे सांबर हे गेल्या सात ते आठ वर्षाचे असल्यापासून दंडोबा परिसरामध्ये वावरत आहे. वारंवार ते शेतकर्यांना अथवा अधिकार्यांना त्याचे दर्शन होत असल्याची सांगण्यात आले.
मिरज-कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवरील दंडोबा वन क्षेत्रामध्ये आजारी स्थितीत सांबर आढळून आले असून भटक्या श्वानापासून त्याचा बचाव व्हावा यासाठी नागरिकांनी त्याला वन विभागाच्या ताब्यात दिले.