सिंधुदुर्ग : पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पलायन केलेल्या तिघा संशयितांना आंबोली पोलिसांनी येथील चेकपोस्टवर शस्त्रासह ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन शस्त्र व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. आपण पकडले जाऊ नये यासाठी त्यांनी पकड मोहीम राबवणाऱ्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही त्यांना पकडण्यात यश आले. ही कारवाई आज दुपारी करण्यात आली. हेही वाचा.उजनी धरणावर साकारणार पूल, बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंजुरी याबाबत पोलीस ठाण्याचे हवालदार दत्ता देसाई यांनी दुजोरा दिला आहे. त्यांना घेऊन पोलीस सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. ही कारवाई अभिजीत कांबळे, दीपक शिंदे व दत्तात्रय देसाई यांनी केली.