सावंतवाडी रोड टर्मिनसवर रेल्वे गाड्यांना थांबा, टर्मिनसला प्रा मधू दंडवते यांचे नाव, गाड्यात पाणी भरण्याची सुविधा अशा विविध मागण्यांसाठी सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने घंटानाद आंदोलन छेडले. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, भाजपचे माजी आमदार राजन तेली, ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ आदींनी भेट देऊन घंटानाद आंदोलनाला प्रतिसाद दर्शविला.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला टर्मिनस नामकरण, रेल हाॅटेल, रस्ता व एक बैठक आयोजित करावी आदींबाबत सविस्तर चर्चा केली. केसरकर म्हणाले, सावंतवाडी रोड टर्मिनस भूमिपूजन झाले तसे नामकरण करण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. रस्ता मंजूर असून बैठक आयोजित करून चर्चा घडवली पाहिजे असे आपण कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्याशी बोललो आहे. रेल्वेत पाणी भरण्यासाठी योजना राबविली जाणार असून मळगाव, कुंभार्ली व वेत्ये गावालाही पाणी पुरवठा होईल अशा स्वरूपाचा आराखडा बनवला आहे असे केसरकर यांनी सांगितले. तसेच रेल हाॅटेल प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वेशी अधिक चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले.

Youth committed suicide by jumping from railway bridge in Ratnagiri
रत्नागिरीत रेल्वे पुलावरुन उडी मारुन तरुणाची आत्महत्या
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Amol Kolhe On Ajit Pawar
Amol Kolhe : अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका; म्हणाले, “सेनापतीच गळपटला तर…”
karnataka government on sbi pnb banks
“SBI व PNB मधील सर्व खाती बंद करा, ठेवी काढून घ्या”, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, सरकारी विभागांना दिले आदेश!
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हेही वाचा – Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढणार का? अजित पवार म्हणाले, “कायमस्वरुपी…”

भाजपचे माजी आमदार राजन तेली म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून मागण्या पोहचवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जातोय. रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे त्याला माझा पाठिंबा आहे. प्रसंगी नेतृत्व देखील करेन. त्यासाठी प्रवाशांची एकजूट महत्त्वाची आहे. रेल्वे यंत्रणा दाद देत नसेल तर वठणीवर आणण्यासाठी एकजूट दाखवावी. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही असे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर म्हणाले,आजच आंदोलन हे झोपेच सोंग घेतलेल्या लोकांना जाग आणण्यासाठी आहे. सावंतवाडी टर्मिनसच भुमिपूजन होऊन ५० टक्के काम पूर्ण झाल. मात्र, उर्वरीत काम अडविण्यासाठी काहीजण पुढाकार घेत आहेत. हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ? ते शोधून काढून जनतेन त्यांचा बंदोबस्त करावा. त्याचवेळी रेल्वे टर्मिनसच काम पूर्णत्वास येईल. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्य दिनी ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.

हेही वाचा – Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?

याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अँड. नकुल पार्सेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,नंदू तारी, बाळासाहेब बोर्डेकर,अभिषेक शिंदे, भुषण बांदिवडेकर, सागर तळवणेकर, सागर नाणोसकर, लीलाधर घाडी, नरेंद्र तारी, सुधीर राऊळ, प्रथमेश पाडगांवकर‌, विनोद नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.