महाराष्ट्र शासनाने काजू अनुदान मिळण्यासाठी मागणी अर्ज जमा करण्यासाठी दिलेली अंतिम तारीख ३१ ऑगस्ट ही निघून गेली. मात्र यासाठी आवश्यक असणारे शासनाने प्रसिद्ध केलेले अनुदान मागणीचे विहित अर्ज शासनाच्या कोणत्याही संबधित खात्याकडून अथवा काजू बोर्डाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत किंवा ते अर्ज स्वीकारण्याची यंत्रणाच अद्याप कार्यान्वित नाही, असे बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी म्हटले आहे.

चतुर्थीच्या सणासुदीला आपले हक्काचे काजू अनुदानाचे पैसे मिळतील या भाबड्या आशेने असणारे शेतकरी हवालदिल, निराश आणि हतबल झाले आहेत. या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार संपर्क साधून अनुदानासंदर्भात लेखी निवेदन दिले होते परंतु आश्वासनाव्यतिरिक्त एकही शब्द पाळला नाही किंवा दिलासादायक वक्तव्य केले नाही.

Devendra Fadnavis On PM Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदी नवरात्रीत करतात कडक उपवास; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते फक्त…”
Ahmednagar, accused ran away,
अवघ्या शंभर मीटर अंतरावर पोलीस ठाणे, तरी पोलिसांच्या…
Jaisingh Ghosale, Shivsena Thackeray group,
शिवसेना ठाकरे गटाचे जयसिंग घोसाळे शिंदे गटात दाखल, रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का
PM Narendra Modi
PM Narendra Modi : “विकासकामे थांबवणाऱ्यांना सत्तेपासून लांब ठेवा”, पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
Narendra Modi Speech in Thane
Narendra Modi Marathi Speech : “महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय…”, ठाण्यात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जनतेशी मराठीतून संवाद; म्हणाले…
Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
Supriya Sule Dandiya
पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, “गुंडगिरी…”
Ajit Pawar On Sunil Shelke
Ajit Pawar : “प्रत्येकजण मरायला आलाय”, सुनील शेळकेंचा विरोधकांना इशारा, अजित पवारांनी भर सभेत टोचले कान; म्हणाले, “जरा…”
Vellore, Reliance projects, Ratnagiri, employment,
रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित; २० हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार – उदय सामंत

हेही वाचा – सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

हेही वाचा – Sharad Kelkar : “छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणं वेदनादायी”, अभिनेता शरद केळकरची हळहळ; म्हणाला,” या गोष्टीचं राजकारण…”

यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बुधवार दि. ४ सप्टेंबर रोजी बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनीच्या ऑफिसमध्ये शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण सर्वांनी सदर बैठकीस वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष विलास सावंत यांनी केले आहे.