scorecardresearch

एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर लोकल प्रवासाची मुभा?; राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती

सध्या दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच मुंबईमध्ये लोकलने प्रवास करण्यास परवानगी आहे.

एक डोस घेतलेल्यांना दिवाळीनंतर लोकल प्रवासाची मुभा?; राजेश टोपे यांची महत्त्वाची माहिती

राज्यात शाळा, सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मंदीरे उघडण्यात आली आहेत. कार्यक्रमांमध्ये जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. आत्ताच दसरा झाला असून काही दिवसांनी दिवाळी आहे, अशात लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येत असून बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दिवाळीनंतरही कोरोना बाधितांची संख्या कमी राहिली तर, निर्बंध असलेल्या भागात शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवास नाही. मॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही. तसेच कोविशील्ड लसीमधील दोन डोसचं अंतर हे ८४ दिवसांचं आहे. त्यामुळे लोकांना असुविधा होत आहे. त्यामुळे आरोग्य सेतू अपमध्ये ज्या व्यक्तीचं स्टेटस सुरक्षित असेल, अशा लोकांना सवलती देता येईल का यासंदर्भात चर्चा केली जाईल. दिवाळीनंतर करोना रुग्णांची आकडेवारी काय असेल, यावरूनच एक डोस असलेल्या लोकांना प्रवासात सवलत देण्याबाबत टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असंही टोपे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-10-2021 at 15:45 IST

संबंधित बातम्या