scorecardresearch

Premium

घाटघरला साडेसहा इंच पाऊस

मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार आषाढसरी बरसल्या.

घाटघरला साडेसहा इंच पाऊस

मुळा व भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे. कळसूबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांत सलग दुसऱ्या दिवशी जोरदार आषाढसरी बरसल्या. घाटघरला २४ तासांत साडेसहा इंच पाऊस पडला. भंडारदऱ्याच्या पाणीसाठय़ात जोरदार वाढ होत असून मुळा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे.
रविवारपासून धरणाचे पाणलोट क्षेत्रासह तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सून सक्रिय झाला. पाणलोट क्षेत्रात जोरदार आषाढसरी कोसळत आहे. या पावसामुळे सहय़ाद्रीच्या डोंगररांगांतील लहानमोठे ओढे, नाले खळाळत वाहू लागले आहेत. भंडारदरा धरणात होणारी पाण्याची आवकही चांगलीच वाढली आहे. सोमवारी दिवसभरातील बारा तासांत २६६ दक्षलक्ष घनफूट नवीन पाणी आले. सायंकाळी धरणातील पाणीसाठा १ हजार ३३८ दक्षलक्ष घनफूट झाला होता. सध्या धरणातून ५३८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात घाटघर येथे आज सर्वाधिक म्हणजे १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : रतनवाडी-११३, पांजरे-१२१, भंडारदरा-६८, वाकी-७५, निळवंडे-२७, अकोले-८९.
हरिश्चंद्रगड परिसरात होत असणाऱ्या पावसामुळे मुळा नदी जोमाने वाहू लागली आहे. मुळा नदीचे पाणी रविवारी रात्री नव्याने बांधलेल्या िपपळगाव खांड येथे तलावात येऊन पोहोचले. हा तलाव एकदोन दिवसांत भरण्याची शक्यता आहे. तालुक्याच्या पूर्व भागात आज पावसाचे प्रमाण कालच्या तुलनेत कमी होते, पण रविवारी पडलेल्या चांगल्या पावसामुळे मुळा-प्रवरा खोऱ्यांमध्ये खरिपाच्या पेरण्या मार्गी लागतील.

MHADA plot lease expensive
म्हाडा भूखंड भाडेपट्टा महाग, पुनर्विकासात पुन्हा अडचण
heavy rainfall recorded ain sangli district
सांगली: धनगरवाड्यात पावसाचा धुमाकूळ, दोन तासात १६१ मिमी.
chital, Chital injured in collision with unknown vehicle gondiya
गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी
Kalubai temple closed
सातारा: मांढरदेव येथील काळुबाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीमुळे दर्शन आठ दिवस बंद

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Six and a half inches rain in ghataghar

First published on: 23-06-2015 at 03:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×