गुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीत साईभक्तांनी कोट्यवधींचं दान केलं आहे. साईभक्तांनी फक्त चार दिवसांमध्ये साईबाबांच्या चरणी सहा कोटी ६६ लाख रुपयांचं दान केलं आहे. गुरुपौर्णिमा उत्सव काळात शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. देशभरातून आलेले भाविक शिर्डीत साईचरणी गुरुदक्षिणा देत असतात. गतवर्षीच्या तुलनेत यावेळी एक कोटींचं अधिक दान जमा झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी भक्तांनी साई मंदिराच्या दक्षिण पेटीत तीन कोटी ८४ लाखांचं दान दिलं आहे. याशिवाय एक कोटी ५७ लाख रुपये देणगी काऊंटरवर देण्यात आले. तर ऑनलाइन ट्रान्सफर, चेक आणि डीडी यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये जमा झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, दानपेटीत परकीय चलनही मिळालं आहे. ही रक्कम एकूण ११ लाख २५ हजार रुपये आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six crores sixty lakhs donation in shirdi sai temple
First published on: 30-07-2018 at 18:25 IST