सोलापुरात जीप अपघातात सहा जणांचा मृत्यू

अक्कलकोट येथून प्रवासी घेऊन निघालेल्या या जीपमध्ये (एमएच १३ एएक्स १२३७) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते.

सोलापूर : अक्कलकोट येथून प्रवासी भरून सोलापूरकडे येणाऱ्या जीपचा अपघात होऊ न त्यात दोन महिलांसह सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अन्य ८ प्रवासी जखमी झाले. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूरजवळ कुंभारी येथे हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात पाच प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले.

अक्कलकोट येथून प्रवासी घेऊन निघालेल्या या जीपमध्ये (एमएच १३ एएक्स १२३७) क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले होते. ही जीप भरधाव वेगात असतानाच तिचा टायर फुटल्याने ती उलटून हा अपघात झाला. सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. या अपघातातील पाच मृतांची ओळख पटली असून त्यात दोघा मायलेकाचाही समावेश आहे.पाचव्या मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. कट्टय़व्वा यल्लप्पा बनसोडे (वय ५५) तिचा मुलगा बसवराज बनसोडे (वय २७), आनंद इरप्पा गायकवाड (वय २५, तिघे रा. ब्यागेहळ्ळी, ता. अक्कलकोट) लक्ष्मण मुरलीधर शिंदे (वय ४२, रा. बणजगोळ, ता. अक्कलकोट) आणि आनंद युवराज लोणारी (वय २५) अशी ओळख पटलेल्या पाच मृतांची नावे आहेत. ४० वर्षांच्या एका मृत महिलेची ओळख पटली नाही. मृतांपैकी आनंद लोणारी हे शिक्षक होते. जखमींमध्ये अक्षय लक्ष्मण शिंदे (वय १९, रा. बळजगोळ), समर्थ प्रशांत अनंत (वय २०), विशाल दगडू गोरसे (वय २४), गुरुराज रवींद्र वांजरे (वय २८), सैफन इब्राहीम वाडीकर (वय ६०), रमाबाई यल्लप्पा बनसोडे (वय ५५), विशाल यल्लप्पा बनसोडे (वय १८) आणि निजाम हनीफ मुल्ला (वय २८) यांचा समावेश आहे. हे सर्व जण अक्कलकोट परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर  शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सोलापूर-अक्कलकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे वाहन चालवताना अनेक अडथळे येत असून छोटेमोठे अपघात घडत असल्याची तक्रार व्यक्त केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Six killed in jeep accident in solapur zws

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या