सोलापूर : यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी आलेल्या एका कुटुंबीयाच्या मोटारीला मालमोटारीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हास्पेटजवळ ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

राघवेंद्र सुभाष कांबळे (वय २५), त्यांच्या पत्नी जानू राघवेंद्र कांबळे (वय २३), त्यांची मुले राकेश (वय ५) आणि रश्मिका (वय २) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात शेजारच्या इंडी (कर्नाटक) तालुक्यातील नंद्राळ येथील दोन नातेवाइकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यांची नावे समजू शकली नाहीत.

Two houses destroyed, cylinder explosion,
देव तारी त्याला कोण मारी… सिलिंडरच्या स्फोटात दोन घर खाक, तान्हुले बाळ बचावले
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

मृत राघवेंद्र कांबळे हे मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी गावचे राहणारे होते. बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत ते नोकरीस होते. पत्नी व मुलांसह ते बंगळुरूत राहात होते. दरवर्षांप्रमाणे लवंगी गावात यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी कांबळे हे कुटुंबीयांसह १५ दिवसांपूर्वी आले होते. यात्रा संपल्यानंतर ते कुटुंबीयांना घेऊन खासगी मोटारीने बंगळुरूला परत निघाले होते. वाटेत इंडी तालुक्यातील नंद्राळ येथून त्यांनी आपल्या दोन नातेवाईकांनाही मोटारीत सोबत घेतले होते. मोटार कर्नाटकातील हा?स्पेटजवळ दोड्डीनाळ गावानजीक समोरून भरधाव येणाऱ्या मालमोटारीने कांबळे यांच्या मोटारीला जोरात धडक दिली. यात कांबळे दाम्पत्यासह त्यांची दोन्ही मुले आणि नातेवाईक अशा सर्व सहाजणांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेची माहिती इकडे लवंगी गावात समजताच संपूर्ण गावात शोककळा पसरली. मृत राघवेंद्र कांबळे हे आई-वडिलांस एकुलते एक होते. राघवेंद्र व त्यांच्या पत्नी जानू आणि दोन्ही मुलांचे पार्थिव सोमवारी दुपारी लवंगी गावात आणण्यात आले. नंतर सर्व मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.