Siya Goyal Father Clarification Ketan Agrawal Murder Case Update: लोहगड किल्ल्यावरून १८ जून रोजी होणारा पती केतन अग्रवाल याला दरीत ढकलून दिल्याप्रकरणी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी अटकेत आहेत. गुरुवारी पोलीस तपासाच्या अनुषंगाने सिया गोयलला विविध ठिकाणी नेत असताना सियाने माध्यमांना पाहून केलेली कृती चर्चेत होती. पुण्यातील घरातून बाहेर पडताना माध्यमांचे कॅमेरे पाहून सिया गोयलने अश्लील हावभाव केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता. यासंबंधी काही फोटो आणि व्हिडीओही समोर आणले गेले. अखेर सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी या संदर्भात खुलासा केला आहे.
केतन अग्रवाल प्रकरणाच्या तपासासाठी सिया गोयलला गुरुवारी पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील तिच्या घरी नेण्यात आले होते. पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया आणि चौकशी झाल्यानंतर तिला पोलीस पुन्हा घेऊन जात असताना पत्रकारांकडे पाहून अश्लील कृती केल्याचा तिच्यावर आरोप होता.
दरम्यान सियाच्या कथित कृतीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जाऊ लागला. अनेकांनी तिच्या पूर्वीच्या व्हायरल होणाऱ्या पार्टिच्या व्हिडीओची आणि आताच्या वर्तनाची तुलना करत तिच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सियाच्या वडिलांनी काय म्हटले?
दरम्यान सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी या प्रकरणी आता भाष्य केले आहे. प्रवीण गोयल यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे आपली बाजू मांडली आहे.
“सियाचे हावभाव अश्लील नव्हते, असा खुलासा त्यांनी केला. पोलिसांच्या वाहनात बसत असताना तिच्या हातावर दरवाजा आदळल्यामुळे तिच्या बोटाला सूज आली होती. तिला घरी आणल्यावर आम्हालाही तिने बोटावरची जखम दाखवली होती. तिचे बोट काळे-निळे पडले होते. फोटोतही ते पाहता येऊ शकेल. मात्र यानिमित्ताने तिच्याबद्दल जो गैरसमज पसरवला जात आहे, तो अत्यंत चुकीचा आहे”, असा दावा प्रवीण गोयल यांनी केला.
पाहा व्हिडीओ
केतन अग्रवाल हत्याकांड में आरोपी सिया गोयल के अश्लील उंगली दिखाने पर उसके पिता प्रवीण गोयल का बयान..
— Jayprrakash Singh (@jayprakashindia) July 4, 2026
प्रवीण गोयल का दावा है कि उनके बेटी सिया को उंगली में चोट लगी थी, पुलिस की कार में बैठने के बाद कार का दरवाजा सिया के हाथ में लगा और उसकी उंगली घायल हो गई.. सिया ने कोई भी अश्लील… pic.twitter.com/b70N6XSg3h
सिया-चेतनला १४ दिवसांची पोलीस कोठडी
तपासकर्त्यांनी दिलेले पुरावे आणि आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर पुणे सत्र न्यायालयाने सिया आणि चेतन या दोघांना १६ जुलैपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भावनाशून्य आणि निर्दयी, माजी आयपीएस अधिकाऱ्याची टीका
आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी एक्सवर पोस्ट करत सिया गोयलच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. “मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक अट्टल गुन्हेगार आणि हत्येच्या आरोपींशी संवाद साधला आहे. जेव्हा पीडित व्यक्ती पूर्णपणे निष्पाप असते, तेव्हा अशा बहुतांश गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात पश्चाताप, दुःख किंवा मानसिक अस्वस्थता दिसून येते.”
ते पुढे म्हणाले, “पण या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर अशा कोणत्याही भावनेचा लवलेशही नाही, जे अत्यंत भयानक आहे. या प्रकरणातील आरोप पाहता, हा गुन्हा अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्वनियोजित कट रचून करण्यात आला आहे. हत्येनंतरचे तिचे वर्तनही तितकेच संतापजनक आणि निर्दयी आहे.”
